Indian Premier League (IPL) : आयपीलएच्या १३ व्या मोसमावर Corona Virus चे सावट आहे. सध्या जगभरात या व्हायरसनं थैमान माजवले आहे. त्यामुळे आयपीएल रद्द होणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे. पण, आयपीएलमधील फ्रँचायझिंना तसे होऊ द्यायचे नाही. तसे झाल्यास त्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळेच त्यांनी एक शक्कल लढवली आहे. पण, त्याचा थेट फटका प्रेक्षकांना बसणार आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे आयपीएलचे सामने बंद स्टेडियममध्ये खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.
IPL 2020 स्पर्धा पुढे ढकलणार? BCCI कडून मिळाली मोठी अपडेट!
कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत ३६६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकाच दिवसात १७५२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली, त्यापैकी ८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जवळपास ८० हजार कोरोनाग्रस्त असल्याचे पुढे आले आहे. त्यापैकी ३००० जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याची माहिती आहे. जगभरात १ लाख ०७ हजार ८०३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या सामन्यांना होणारी गर्दी लक्षात घेता संघ मालकांकडून एक प्रस्ताव येत आहे. आयपीएलच्या सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश न देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येत असल्याचे समजते.
Business Standard ने दिलेल्या वृत्तानुसार फ्रँचायझींनी सामन्यांच्या तिकीटांची विक्री करू नका, असे सांगितले आहे. आरोग्य मंत्री यांनी याआधीच कोरोना व्हायसरमुळे चिंता व्यक्त केली होती. आरोग्य मंत्री आणि बीसीसीआय यांच्यात लवकरच बैठक अपेक्षित आहे. ''सामना पाहण्यासाठी स्टेडिमयवर ३० ते ४० हजार लोकं एकाच वेळी काही तासांसाठी एकत्र येणार आहेत. त्यात परदेशातील प्रेक्षकांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे अशा वेळी एखाद्याला जरी कोरोनाची लागण असल्यास, त्याचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएलच्या सामन्यांच्या तिकीटांची विक्री न करता सामने बंद दरवाजात खेळवण्यात यावे,''असे आयपीएलमधील एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
तिकीटांच्या विक्रीतून संघांना ८ ते १० कोटी रुपये मिळतात. अन्य महसुलाच्या तुलनेत ही रक्कम फार थोडी आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला जाऊ शकतो.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघात दोनच भारतीय, ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व!
...तर स्टार्कला एका सेकंदात 'जोरू का गुलाम' ठरवलं असतं, सानिया मिर्झाचा खोचक टोमणा
विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा 'झिंगाट' डान्स, पाहा Video
टीम इंडियात पुनरागमन? MS Dhoniसाठी अटी अन् शर्ती कायम, BCCIकडून स्पष्ट संकेत
टीम इंडियाच्या ओपनरने तीन दिवसांत अव्वल स्थान गमावले
Web Title: IPL 2020: Corona Viras effect, As Stakeholders Want Closed-Door Games svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.