IPL 2020 : म्हातारपणी असा अपमान का करून घेतोस? अभिनेत्याचा MS Dhoniला निवृत्तीचा सल्ला; चाहत्यांनी घेतली शाळा

IPL 2020 : या विजयामुळे हैदराबादचा संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर सलग तिसऱ्या पराभवामुळे चेन्नई गुणतालिकेत तळाला आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 3, 2020 04:49 PM2020-10-03T16:49:02+5:302020-10-03T16:49:48+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : ‘Cricket mat sikha baap ko’ – Fans lose their cool after kamaal r khan urges MS Dhoni to retire | IPL 2020 : म्हातारपणी असा अपमान का करून घेतोस? अभिनेत्याचा MS Dhoniला निवृत्तीचा सल्ला; चाहत्यांनी घेतली शाळा

IPL 2020 : म्हातारपणी असा अपमान का करून घेतोस? अभिनेत्याचा MS Dhoniला निवृत्तीचा सल्ला; चाहत्यांनी घेतली शाळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) सलग तिसरा पराभव पत्करावा लागला आहे. सनरायझर्स हैदराबादनं ( Sunrisers Hyderabad) चेन्नईवर ७ धावांनी विजय मिळवला. प्रियम गर्गची शानदार अर्धशतकी खेळी आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे SRHनं हा विजय मिळवला.  या पराभवानंतर CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याचं वाढतं वय पुन्हा चर्चेचा विषय बनलं आणि एका अभिनेत्यानं त्याला निवृत्तीचा सल्ला दिला. RCB vs RR Latest News & Live Score

SRHसाठी प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मानं पाचव्या विकेटसाठी ७७ धावांची भागिदारी रचली. गर्गनं २६ चेंडूंत ५१ धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याला शर्मानं २४ चेंडूंत ३१ धावा काढून चांगली साथ दिली. हैदराबादनं २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. हैदराबादनं २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. शेन वॉटसन, अंबाती रायडू, केदार जाधवला दुहेरी धावसंख्यादेखील गाठता आली नाही. तर सलामीवीर फॅफ ड्युप्लीसीस २२ धावा काढून माघारी परतला. त्यामुळे चेन्नईचा संघ ४ बाद ४२ असा अडचणीत सापडला. RCB vs RR Latest News & Live Score

कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जाडेजानं पाचव्या विकेटसाठी ७२ धावांची भागिदारी रचत संघाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र एका बाजूला आवश्यक धावगती वाढत होती. त्यामुळे मोठे फटके मारणं गरजेचं आहे. जाडेजानं ३५ चेंडूंत ५० धावांची खेळी साकारली. मात्र फटकेबाजी करताना तो बाद झाला. धोनीनं मोठे फटके मारण्यास सुरुवात केली तेव्हा उशिरा झाला होता. धोनी ३६ चेंडूंत ४७ धावा काढून नाबाद राहिला. चेन्नईला २० षटकांत ५ बाद १५७ धावाच करता आल्या.  RCB vs RR Latest News & Live Score

त्यानंतर कमाल आर खान यानं ट्विट केलं की,'' केस काळे करुन कोणी तरुण होत नाही. दुसरी धाव घेताना  तुला धाप लागत होती. वय वाढल्यानंतर असा त्रास होतोच. पण म्हातारपणी असा अपमान का करुन घेतोस? आम्ही तुझे फॅन आहोत, तुझी अशी अवस्था पाहून खुप दु:ख होतंय. त्यामुळे कृपया तू निवृत्ती स्वीकार.'' 


Ms Dhoniच्या चाहत्यांनी घेतली शाळा



Web Title: IPL 2020 : ‘Cricket mat sikha baap ko’ – Fans lose their cool after kamaal r khan urges MS Dhoni to retire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.