मुंबई : यंदाची Indian Premier League (IPL 2020) यूएईमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आणि त्यानंतर क्रिकेटविश्वात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र यातही एका संघाला स्पर्धेला सुरुवात होण्याआधीपासूनच एकामागून एक धक्के बसले. हा संघ म्हणजे चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings). तीनवेळचा विजेता असलेल्या सीएसकेला यंदाच्या स्पर्धेत आपल्या दोन स्टार खेळाडूंविना खेळावे लागत आहे. सुरेश रैना (Suresh Raina) आणि हरभजन सिंग (Harbhajan Singh) हे संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक, मात्र दोघांनी यंदाच्या सत्रातून वैयक्तिक कारण देत माघार घेतली. त्यामुळेच आता सीएसकेने या दोन्ही खेळाडूंविरुद्ध मोठे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.हरभजन सिंगने यूएईमध्ये येण्याआधीच आपला निर्णय जाहीर केला. मात्र सुरेश रैनाने यूएईमध्ये पोहचल्यानंतर काही दिवसांनीच वैयक्तिक कारण देत भारतात परतण्याचा निर्णय घेतला. यानंतर सीएसकेने आपल्या संकेतस्थळावरुन दोघांचेही नाव हटविले होते. मात्र आता या दोघांविरुद्ध सीएसकेने मोठे पाऊल उचलले असून यानुसार त्यांना पुढील वर्षीही आयपीएलला मुकावे लागू शकते.आयपीएल लिलाव निर्देशांनुसार २०१८ साली हरभजन आणि रैना यांचा तीन वर्षांसाठी सीएसकेसोबत करार झाला होता. हा करार २०२० साली संपुष्टात येणार होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीएसकेने आता अधिकृतपणे दोन्ही खेळाडूंसोबतचा करार संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. रैनाला प्रत्येक वर्षी ११ करोड रुपयांप्रमाणे, तर हरभजनला प्रत्येक वर्षासाठी २ करोड रुपयांप्रमाणे करारबद्ध करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार आता या दोन्ही खेळाडूंना यंदाचे वेतन मिळणार नाही. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनीही सांगितले होते की, खेळाडूंना वेतन तेव्हाच मिळेल, जेव्हा ते खेळतील.’आता या दोन्ही खेळाडूंचा करार खरंच संपुष्टात आला, तर दोघांसाठी हे अडचणीचे ठरेल. कारण, पुढील वर्षी वेळेच्या कमतरतेमुळे बीसीसीआय कदाचित खेळाडूंचा लिलाव आयोजित करणार नाही आणि अशा परिस्थितीत रैना आणि हरभजन यांचा सीएसकेसोबत कोणताही करार राहणार नाही. त्यामुळे त्यांना पुढील आयपीएल सत्रापासूनही दूर रहावे लागेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2020: सीएसकेकडून रैना, हरभजन यांना टाटा-बायबाय करण्याची तयारी सुरू
IPL 2020: सीएसकेकडून रैना, हरभजन यांना टाटा-बायबाय करण्याची तयारी सुरू
IPL 2020 CSK to say goodbye to Harbhajan Singh Suresh Raina: दोन्ही खेळाडूंविरुद्ध सीएसके उचलणार मोठं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 3:40 PM