Indian Premier League ( IPL 2020) मध्ये खेळत नसला तरी चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) याला सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर ( MS Dhoni) हसणे त्याला महागात पडले आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातल्या सामन्यात अम्पायर पॉल रैफेल यांच्या निर्णयावर धोनीनं नाराजी व्यक्त केली आणि पॉल यांनी झटक्यात निर्णय बदलला. त्यावरून सोशल मीडियावर समर्थनात व विरोधात असे दोन गट पडले.
हरभजन सिंगनं या प्रसंगाचा व्हिडीओ पोस्ट करून त्यावर स्मायली इमोजी पोस्ट केले. त्यावरून भज्जीवर टीका होत आहे.
त्याची ही प्रतिक्रिया अनेकांना आवडली नाही. एकानं लिहिलं की,''पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला हरभजन सिंग पाठिंबा देतो, परंतु धोनीची फिरकी घेतो.
''चेन्नई सुपर किंग्सच्या संघात काय चालले हे मला माहीत नाही. भज्जी व रैना यांनी का माघार घेतली याचीही माहिती नाही, परंतु आपल्याच संघाच्या कर्णधारला ट्रोल करणं चुकीचं आहे. याला खालच्या दर्जाची खिलाडूवृत्ती म्हणतात.''
Web Title: IPL 2020: CSK Fans Take a Swipe At Harbhajan Singh For His Reaction Over MS Dhoni’s Wide Ball Controversy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.