ललित झांबरे
आयपीएल 2020 (IPL 2020) च्या प्ले ऑफमध्ये मुंबई (Mumbai) सोडून इतर तीन संघ कोणते असतील याची चुरस आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) संघ बाद झालेला असला तरी उरलेले सामने जिंकून ते स्पर्धेतील संघांचे समीकरण बिघडवू शकतात. गुरुवारच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR). विजय मिळवून त्यांनी तेच केले. कोलकाता नाईट रायडर्सचा मार्ग त्यांनी आता अधिकच कठीण करून ठेवलाय. मात्र अजुनही केकेआरचे आव्हान संपलेले नाही.
केकेआरचे आता 13 सामन्यांतून 12 गूण आहेत आणि नेट रनरेट उणे 0.467 आहे. आता त्यांचा फक्त राजस्थान रॉयल्सशीच सामना बाकी आहे. मॉर्गनच्या संघाला प्ले ऑफच्या आशा कायम ठेवायच्या असतील हा सामना जिंकावाच लागणार हे तर स्पष्टच आहे तरच ते 14 गूणांपर्यंत पोहोचतील पण एवढ्यावरच भागणार नाही, तर इतर सामन्यांचे निकालही त्यांचे भवितव्य ठरवतील. त्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने आपले पुढचे दोन्ही सामने गमवायला हवेत. राजस्थान रॉयल्स व सनरायजर्स हैदराबादने त्यांच्या उरलेल्या दोन सामन्यांपैकी फक्त एकच जिंकायला हवा. असे झाले तरच नेट रन रेटची गरज न पडता 14 गुणांसह ते प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतात.
नेट रन रेटवर गोष्ट आलीच तर राजस्थान रॉयल्सचा नेट रन रेट केकेआरपेक्षा कमी आहे आणि त्याचे गुणही 10 च आहेत. याचा अर्थ राजस्थानला दोन्हा सामने जिंकावे तर लागणार आहेतच पण मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.