Join us  

IPL 2020 CSK vs KKR: कोलकाताने हिसकावला चेन्नईच्या हातातील सामना; केकेआरचा १० धावांनी विजय

IPL 2020 CSK vs KKR: कोलकाताच्या १६७ धावांचा पाठलाग करताना चेन्नईला ५ बाद १५७ धावांचीच मजल मारता आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 2:49 AM

Open in App

अबुधाबी : धावांचा पाठलाग करताना पहिल्या दहा षटकांमध्ये वर्चस्व राखल्यानंतरही चेन्नई सुपरकिंग्जला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १० धावांनी पराभव पत्करावा लागला. कोलकाताच्या १६७ धावांचा पाठलाग करताना चेन्नईला ५ बाद १५७ धावांचीच मजल मारता आली. चेन्नईने फाफ डूप्लेसिसला (१७) झटपट गमावल्यानंतरही सामन्यावर वर्चस्व राखले. शेन वॉटसनने ४० चेंडूंत ५० धावा करत कोलकातावर दडपण राखले. मात्र, १३व्या षटकात अंबाती रायुडू बाद झाला आणि पुढच्याच षटकात सुनील नरेनने वॉटसनचा बळी मिळवला. येथून मिळवलेली पकड कोलकाताने अखेरपर्यंत कायम राखली.त्याआधी, चेन्नईने गोलंदाजांच्या जोरावर कोलकाताला मर्यादित धावसंख्येत रोखले. ड्वेन ब्रावोने ३ बळी घेतले. मात्र कोलकाताला अडचणीत आणले ते शार्दुल ठाकूर व कर्ण शर्मा यांनी. दोघांनी कोलकाताची मधली फळी उध्वस्त केली. सॅम कुरननेही दमदार मारा करत इयॉन मॉर्गन व कर्णधार दिनेश कार्तिकला बाद केले. एका बाजूने संघाचे हुकमी फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या बाजूने राहुल त्रिपाठीने ५१ चेंडूंत ८१ धावांची खेळी करत संघाला समाधानकारक मजल मारुन दिली.विनिंग स्ट्रॅटेजीएका टोकाकडून विकट पडत असताना राहुल त्रिपाठीने अर्धशतकी खेळी करीत आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली.सामन्यातील रेकॉर्डकेकेआरने पाच वर्षांत ६९ सामन्यात नाणेफेकीचा कौल बाजूने आल्यानंतर आज पहिल्यांदा फलंदाजी घेतली.ड्वेन ब्रावोने आयपीएलमध्ये १५० बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पाचवा गोलंदाज ठरला. सर्वाधिक बळी घेणाºया गोलंदाजांमध्ये ब्रावो चौथ्या स्थानी.टर्निंग पॉइंटरसेलने भेदक मारा करीत प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स