ललित झांबरे
आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्स (MI) व चेन्नई सुपर किंग्जची (CSK) स्पर्धा नवीन नाही.पण यंदा सीएसकेचा संघ पुरता ढेपाळला असून शुक्रवारी त्यांनी आपला आयपीएलमधील सर्वात मोठा पराभव मुंबई इंडियन्सकडूनच स्विकारला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच चेन्नईच्या संघावर कुणीही एकही विकेट न गमावता विजय मिळवला आणि तो मान मुंबई इंडियन्सने मिळवला.
योगायोगाने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये ज्या तीन प्रकारे सामने गमावले जातात (धावांनी, विकेटनी आणि चेंडू राखून), चेन्नई सुपर किंग्जचे ते तीनही सर्वात मोठे पराभव मुंबई इंडियन्सकडूनच आहेत. सीएसकेचा आयपीएलमध्ये धावांनी सर्वात मोठा पराभव 60 धावांनी आहे. 2013 मध्ये मुंबई इंडियन्सने त्यांना या अंतराने मात दिली होती. एकही गडी न गमावता म्हणजे 10 गड्यांनी विजय शुक्रवार 23 तारखेचा होता. हाच विजय सार्वाधिक चेंडूंचे अंतर राखूनही ठरला. मुंबईने 12.2 षटकांतच सामना जिंकला म्हणजे तब्बल 46 चेंडू शिल्लक असतानाच सीएसकेने हा सामना गमावला.
चेन्नईचे आयपीएलमधील सर्वात मोठे पराभव
धावा- 60 - वि. मुंबई इंडियन्स - 2013
गडी-- 10 - वि. मुंबई इंडियन्स - 2020
चेंडू--- 46 - वि. मुंबई इंडियन्स - 2020