चेन्नई सुपर किंग्जचे अधिकृत टिष्ट्वटर हॅण्डल असलेल्या चेन्नईआयपीएल या अकाऊंटवर राजस्थान रॉयल्स विरोधातील सामन्याच्या आधी एक टिष्ट्वट करण्यात आले. त्यात आतापर्यंत राजस्थान विरुद्ध चेन्नईच्या सामन्यांची याआधीची आकडेवारी देण्यात आलीहोती. पण त्यात चेन्नईकडून चुक झाली. चेन्नईने आतापर्यंत दोन्ही संघात २२ सामने झाले असून एक सामना टाय झाल्याचे म्हटले आहे. CSK vs RR Live Score & Updates
CSK vs RR Latest News : 'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण
मात्र चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघात आतापर्यंत आयपीएलमध्ये २१ आणि चॅम्पियन्स टी२० लीगमध्ये एक असे २२ सामने झाले आहेत. त्यातील सर्वच सामन्यांचे निकाल लागले आहेत. त्यात चेन्नईने १४ तर राजस्थानने ८ सामने जिंकले आहेत. मात्र चेन्नईने टिष्ट्वट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी राजस्थानने सातच सामने जिंकल्याचे म्हटले आहे. चेन्नईच्या या टिष्ट्वटमध्ये चेन्नईने १४ आणि राजस्थानने ७ सामने जिंकल्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात राजस्थानने ८ सामने जिंकले आहेत.CSK vs RR Live Score & Updates
महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं
- २०१९ च्या सत्रातील दोन्ही सामने चेन्नईने जिंकले होते.
- २०१८ च्या सत्रात चेन्नईने एक तर राजस्थानने एक सामना जिंकला होता.
- २०१५ च्या सत्रात राजस्थानने एक तर चेन्नईने एक सामना जिंकलाहोता.
- २०१४ च्या सत्रात चेन्नईने दोन्ही सामन्यात विजय मिळवला.
- २०१३ च्या सत्रात चेन्नईने एक तर राजस्थानने एक सामना जिंकला होता.
- २०१२ च्या सत्रात चेन्नईने दोन्ही सामन्यात विजय मिळवला.
- २०११ च्या सत्रात चेन्नईने दोन्ही सामन्यात विजय मिळवला.
- २०१० च्या सत्रात राजस्थानने एक तर चेन्नईने एक सामना जिंकला.
- २००९ च्या सत्रात चेन्नईने दोन्ही सामने जिंकले तर आयपीएलच्या पहिल्या
- सत्रात राजस्थान रॉयल्सने तिन्ही सामन्यात विजय मिळवला होता.
- त्या शिवाय दोन्ही संघ २०१३ च्या चॅम्पियन्स टी२० लीगमध्ये
- एकमेकांविरोधात उपांत्य फेरीत खेळले होते. त्यात राजस्थानने विजय मिळवला होता.
पियुष चावला सोशल मिडियावर ट्रोल; ४ षटकांतच दिल्या ५५ धावा
चेन्नईसुपर किंग्जचा फिरकीपटू पियुष चावला याने चार षटकांतच ५५ धावा दिल्या. आयपीएलच्या फटकेबाजीत या आधीही अनेक गोलंदाजांनी ५० आणि ६० पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. मात्र पियुष याने त्याच्या पहिल्या दोन षटकांतच ४७ धावा दिल्या होत्या. त्यामुळे सध्या टिष्ट्वटरवर पियुष चावला जास्त ट्रोल होत आहे. संजु सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी चेन्नईच्या गोलंदाजीची पिसे काढली. त्यात चावला ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. ‘बहुतेक आज चावला सर्वात वेगवान अर्धशतक पुर्ण करणार, पण बॅटने नाही तर बॉलने’ अशा आशयाच्या अनेक ट्विटमध्ये चावलाची खिल्ली उडवण्यात आली होती. चावलाच्या आधी अनेकांनी ४ षटकांत ५० पेक्षा जास्त धावा दिल्या आहे. सर्वात जास्त चार षटकात ७० धावा या बसील थम्पी याने एसआरएच कडून आरसीबी विरोधात खेळताना दिल्या होत्या.