Join us  

दुष्काळात तेरावा महिना; Chennai Super Kingsचे दोन तगडे खेळाडू IPL 2020च्या पहिल्या सामन्याला मुकणार

CSK in troubles IPL 2020 : उपकर्णधार सुरेश रैना आणि अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणास्तव यंदाच्या IPL2020मधून माघार घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 4:03 PM

Open in App
ठळक मुद्देसुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी माघार घेतल्यानं आधीच टेंशनपहिल्या दोन सामन्यांना दोन स्टार खेळाडूंना खेळता येणार नाहीमुंबई इंडियन्स संघाविरुद्ध खेळणार सलामीचा सामना

Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या मोसमाची सुरुवात गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्या सामन्यानं होईल. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी Chennai Super Kings संघाला मोठे धक्के बसले. सुरेश रैना आणि हरभजन सिंग हे दोन प्रमुख खेळाडूंनी IPL 2020मधून माघार घेतली. आयपीएलसाठीच्या सरावाला सुरुवात करण्यापूर्वी Chennai Super Kingsच्या दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील 11 सदस्यांना कोरोनाची लागण झाली. या संकटात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) च्या संघाची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात आता CSKला आणखी एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे. (CSK in troubles IPL 2020) 

IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं मैदानावर उतरण्यापूर्वी CSKला नमवलं; घेतली मोठी भरारी!

उपकर्णधार सुरेश रैना आणि अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणास्तव यंदाच्या IPL2020मधून माघार घेतली. त्यांच्या जागी बदली खेळाडूंची नावं अजूनही जाहीर केलेली नाहीत. त्यात BCCIनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार CSK आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. पण, आता त्यातही चेन्नईचे दोन तगडे खेळाडू सलामीच्या सामन्यात खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. (CSK in troubles IPL 2020) 

CSKच्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी MS Dhoniचा 'धाडसी' निर्णय; तुम्हीही कराल कौतुक  

सुरेश रैना, भज्जीच्या माघारीनं CSKचं टेंशन वाढवलं; महेंद्रसिंग धोनीच्या संघाचं संपूर्ण वेळापत्रक 

Mumbai Indians विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात CSKचे जोश हेझलवूड आणि अष्टपैलू सॅम कूरन यांना सहभाग घेता येणार नाही. ही दोघंही सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील सदस्य आहेत आणि 17 सप्टेंबरपूर्वी ते संयुक्त अरब अमिराती येथे दाखल होऊ शकणार नाहीत. दीपक चहरला कोरोना झाल्यामुळे त्याचीही पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता फार कमी आहे. (CSK in troubles IPL 2020) 

''पहिल्या दोन सामन्यात जोश हेझलवूड आणि सॅम कुरन खेळणार नसल्याची मानसिकता आम्ही तयार ठेवली आहे. ड्वेन ब्राव्हो पहिल्या सामन्यात खेळेल. आमच्याकडे सक्षम पर्याय आहेत आणि आम्ही मॅनेज करू,''असे CSKचे सीईओ के. विश्वनाथन यांनी सांगितले. (CSK in troubles IPL 2020) 

ब्राव्होसह कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) मिचेल सँटनर आणि इम्रान ताहीर खेळत आहेत आणि हे तिघे 12-13 सप्टेंबरला संयुक्त अरब अमिराती येथे दाखल होतील. ही तिघं 6 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करतील आणि त्यांची तीनवेळा कोरोना चाचणी करण्यात येईल. या तिनही चाचणी निगेटिव्ह आल्यास, ते पहिल्या सामन्यात मैदानावर उतरतील. CSKकडे शेन वॉटसन आणि लुंगी एनगिडी हेच दोन पर्याय आहेत.  विश्वनाथन यांनी सांगितले की,''आम्ही कॉन्फिडंट आहोत.. आमच्याकडे पुरेसे पर्यायी जलगदती गोलंदाज आहेत. शार्दूल ठाकरू, के.एम. आसीफ आणि मोनू कुमर यांच्यासह तीन जलदगती नेट बॉलर आमच्याकडे आहेत.''(CSK in troubles IPL 2020) 

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेचा कोणत्या संघाला सर्वाधिक फटका?आयपीएल 2020 साठी झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या 17 खेळाडूंना सर्वाधिक 86.7 कोटी इतकी रक्कम मिळाली. इंग्लंडच्या 11 खेळाडूंना 43.8 कोटी रुपये मिळाले.

  1. चेन्नई सुपर किंग्स - सॅम कुरन, जोश हेझलवूड, शेन वॉटसन
  2. दिल्ली कॅपिटल्स - अॅलेक्स करी, जेसन रॉय, मार्कस स्टॉयनिस
  3. कोलकाता नाइट रायडर्स - पॅट कमिन्स, ग्रीन , गर्नी, इयॉन मॉर्गन, टी बँटन
  4. किंग्स इलेव्हन पंजाब - ख्रिस जॉर्डन, ग्लेन मॅक्सवेल
  5. सनरायझर्स हैदराबाद - जॉनी बेअरस्टो, मिचेल मार्शस स्टँनलेक, डेव्हीड वॉर्नर
  6. राजस्थान रॉयल्स - जोफ्रा आर्चर, जोस बटलर, टॉम कुरन, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अँड्य्रू टाय
  7. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - मोईन अली, अॅरोन फिंच, जे. फिलिफ, केन रिचर्डसन  

युवराज सिंग देणार 'मोठं' सप्राईज; 'सिक्सर किंग'ची चाहत्यांना सुखावणारी बातमी!

टॅग्स :आयपीएल 2020चेन्नई सुपर किंग्सइंग्लंडआॅस्ट्रेलिया