भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल ) 13वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीय येथे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) संघ पुन्हा क्वारंटाईन झाला आहे. त्यांच्या ताफ्यातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा सदस्य सध्याच्या भारतीय संघातील जलदगती गोलंदाज असून त्याच्यासह 12 स्टाफ सदस्यांना कोरोना झाला असल्याचा दावा काही इंग्रजी वेबसाईटनी केला आहे. CSK किंवा आयपीएलकडून अद्याप अधिकृत काहीच जाहीर करण्यात आलेले नाही. (Current India bowler, 12 staff members of Chennai Super Kings test positive for Covid-19 )
IPL 2020 : CSKचा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह; आता आयपीएल 2020 होणार रद्द?
अन्य संघांप्रमाणे शुक्रवारी चेन्नईचे खेळाडू सरावासाठी मैदानावर उतरणे अपेक्षित होते, परंतु खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी वाढवण्यात आला. टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दुबईत पोहोचल्यानंतर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत CSKचा एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. हा सदस्या भारतीय संघाचा खेळाडू असल्याची जोरदार चर्चा आहे. आता सर्व सदस्यांची शुक्रवारी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल शनिवारी समोर येईल. (Current India bowler, 12 staff members of Chennai Super Kings test positive for Covid-19 )
''युरोपात फुटबॉलच्या सामन्यांची सुरूवात झाली, तेव्हाही काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानुसार आयपीएलमधील 8 फ्रँचायझींची 1000 हून अधिक सदस्य आहेत आणि येथेही तशी शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही संघासोबत असं घडू शकतं. सर्व प्रकारची खबरदारी घेतल्यानंतर आमचा एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळला, हे दुर्दैव म्हणावं लागेल,''असं सूत्रांनी सांगितले. (Current India bowler, 12 staff members of Chennai Super Kings test positive for Covid-19 )
त्यांनी पुढे हेही सांगितले की,''भारतीय संघाकडून खेळलेला जलदगती गोलंदाजासह काही सदस्यांना कोरोना झाला आहे. संघाच्या मॅनेजमेंटमधील वरिष्ठ अधिकारी आणि त्याची पत्नी अन् सोशल मीडिया टीमच्या दोन सदस्यांना कोरोना झाला आहे.'' (Current India bowler, 12 staff members of Chennai Super Kings test positive for Covid-19 )
Video : केव्हीन ओ'ब्रायननं खेचला असा षटकार की करून घेतलं स्वतःचं नुकसान
IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; खेळाडूंसाठी नियमच बदलला
चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, मुरली विजय, रुतुराज गायकवाड, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन