इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) आगामी मोसमात सनरायझर्स हैदराबाद संघानं कर्णधारपदाची खांदेपालट केली आहे. केन विलियम्सनकडे असलेली नेतृत्वाची जबाबदारी काढून ती आता डेव्हीड वॉर्नरकडे देण्यात आली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघानं गुरुवारी ही घोषणा केली. त्यामुळे आगामी आयपीएल मोसमात वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघ दोन मोसम खेळला. 2016मध्ये वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादनं आयपीएल जेतेपद पटकावलं होतं. आता पुन्हा त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. मागील मोसमात हैदराबादला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. वॉर्नर आणि विलियम्सन या दोघांनाही आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात मार्चमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे.
डेव्हीड वॉर्नर म्हणाला,'' केन विलियम्सन आणि भुवनेश्वर कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मी खेळलो. आगामी मोसमात संघानं नेतृत्वाची जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. केन आणि भुवी मार्गदर्शन करायला आहेतच. यंदा आयपीएल जेतेपद पटकावण्याचा निर्धार आहे.''
सनरायझर्स हैदराबादचं संपूर्ण वेळापत्रकवि. मुंबई इंडियन्स - 1 एप्रिल ( होम) आणि 9 मे ( अवे)वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 4 एप्रिल ( अवे) आणि 12 मे ( होम)वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 7 एप्रिल ( अवे) आणि 5 मे ( होम)वि. राजस्थान रॉयल्स - 12 एप्रिल ( होम) आणि 21 एप्रिल ( अवे)वि. कोलकाता नाईट रायडर्स - 16 एप्रिल ( होम) आणि 15 मे ( अवे)वि. चेन्नई सुपर किंग्स - 19 एप्रिल ( अवे) आणि 30 एप्रिल ( होम) वि. दिल्ली कॅपिटल्स - 26 एप्रिल ( होम) आणि 3 मे ( अवे)
सनरायझर्स हैदराबाद - अभिषेश शर्मा, बसील थम्पी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलेक, डेव्हीड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवास्तव गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृद्धीमान सहा, पियाम गर्ग, विराट सिंग, मिचेल मार्श, फॅबीयन अॅलन, संदीप बवानका, संजय यादव, अब्दुल समद
भारत-पाकिस्तान अन् शारजाहच नातं पुन्हा जुळणार; मार्चमध्ये क्रिकेटचा महामुकाबला होणार
Video : क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी बनला शेतकरी; करतोय सेंद्रीय शेती
IPL 2020 : विराट कोहली ते एबीडी... जाणून घ्या, कोणाला किती 'पगार' देते RCB!
Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचारावर रोहित शर्मानं व्यक्त केली चिंता, म्हणाला...
सराव सत्रात टीम इंडियाचा ओपनर दुखापतग्रस्त; विराट कोहली त्रस्त