शारजाह : दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोक्याच्यावेळी धक्के बसल्याने कोलकाता नाईट रायडर्सला अखेर १८ धावांनी पराभव पत्करावा लागला. नितिश राणाने ३५ चेंडूंत ५८ धावा केल्यानंतर इयॉन मॉर्गनने १८ चेंडूंत ४४ धावांचा तडाखा दिला. मात्र अखेर बाजी मारली ती दिल्लीकरांनी.
लहान मैदानाचा फायदा घेत दिल्लीने २२८ धावांचा एव्हरेस्ट उभारला. सलामीवीर शुभमान गिल (२८) फारशी चमक दाखवू शकला नाही. सुनील नरेनही अपयशी ठरला. राणाने दमदार अर्धशतक झळकावले, मात्र तरीही केकेआरला आवश्यक धावगती गाठता आली नाही.
मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी सामना अवाक्यात आणलाही, परंतु मोक्याच्यावेळी दोघांना बाद करत दिल्लीने बाजी मारली. तत्पूर्वी,अय्यरच्या धमाकेदार नाबाद ८८ धावा आणि सलामीवीर पृथ्वी शॉ (६६), रिषभ पंत (३८) यांच्या जोरावर दिल्लीने वर्चस्व राखले. श्रेयसने ६ षटकारांची आतषबाजी करताना कोलकाताची गोलंदाजी फोडून काढली. रसेलचा अपवाद वगळता कोलकाताच्या सर्व गोलंदाजांची नऊहून अधिक धावगतीने पिटाई झाली.
सामन्यातील रेकॉर्ड
दिल्ली कॅपिटल्सने सातव्यांदा मारली द्विशतकी मजल.
यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीने उभारली सर्वोत्तम धावसंख्या.
पृथ्वी शॉचे सहावे आयपीएल अर्धशतक.
टर्निंग पॉइंट
फलंदजांच्या कामगिरीनंतर हर्षल पटेलसह गोलंदाजांनी अचूक मारा करीत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवले.
विनिंग स्ट्रॅटेजी
श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ व पंत यांनी उल्लेखनीय योगदान देत संघाला विशाल धावसंख्या उभारुन दिली.
Web Title: IPL 2020 DC vs KKR delhi capitals beat kolkata knight riders by 18 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.