IPL 2020 DC vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पराभव पत्करावा लागला. चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf Du Plessis) यांच्या वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर 5 विकेट्स राखून विजय मिळवला. आज IPL 2020तील दुसरा सामना रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात सामना होणार आहे. ( IPL 2020 Live Updates, Click here)
IPL 2020त भीमपराक्रम करण्यासाठी ख्रिस गेल सज्ज; रोहित, विराट यांनाही हा विक्रम मोडणे अशक्य!
2019च्या IPLमध्ये DCने 7 मोसमानंतर प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता, तर KXIP संघाला 2014नंतर एकदाही टॉप फोरमध्ये स्थान पटकावता आलेलं नाही. दोन्ही संघांत काही नवे चेहरे दिसणार आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स (DC) च्या ताफ्यात शिमरोन हेटमायर ( Shimron Hetmyer) आणि मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis) हे दोन तगडे फलंदाज दाखल झाले आहेत. शिवाय त्यांनी आर अश्विन ( R Ashwin) व अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांना ट्रेडवर आपल्या चमूत दाखल करून घेतले. त्यांचा अनुभव DCच्या कामी येईल. ( IPL 2020 Live Updates, Click here)
दुसरीकडे किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) यांच्याही संघात नवे चेहरे दिसणार आहेत. IPL 2020 Auctionमध्ये त्यांनी ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) आणि शेल्डन कोट्रेल ( Sheldon Cottrell) यांच्यासाठी मोठी रक्कम मोजली. अनिल कुंबळे यांचे मार्गदर्शन KXIP संघाला मिळणार आहे. ( IPL 2020 Live Updates, Click here)
दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) ने IPL Auction 2020 त करारबद्ध केलेले खेळाडू जेसन रॉय - 1.50 कोटी , ख्रिस वोक्स - 1.50 कोटी, अॅलेक्स केरी - 2.40 कोटी, सिमरोन हेटमायर - 7.75 कोटी, मोहित शर्मा - 50 लाख, तुषाप देशपांडे - 20 लाख, मार्कस स्टॉयनिस - 4.80 कोटी, ललित यादव - 20 लाख
दिल्ली कॅपिटल्स संभाव्य संघ ( Delhi Capitals likely playing XI ) - शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरोन हेटमायर, श्रेयस अय्यर ( कर्णधार) , रिषभ पंत, किमो पॉल, मार्कस स्टॉयनिस, अमित मिश्रा, आर अश्विन, कागिसो रबाडा, इशांत शर्मा
किंग्स इलेव्हन पंजाब ( दिल्ली कॅपिटल्स ) ने IPL Auction 2020 त करारबद्ध केलेले खेळाडू ग्लेन मॅक्सवेल - 10.75 कोटी, शेल्डन कोट्रेल - 8.50 कोटी, दीपक हूडा - 50 लाख, इशान पोरेल - 20 लाख, रवी बिश्नोई - 2 कोटी, ख्रिस जॉर्डन - 3 कोटी, तजींदर ढिल्लोन - 30 लाख, सिम्रन सिंग - 55 लाख
किंग्स इलेव्हन पंजाब संभाव्य संघ ( Kings XI Punjab likely playing XI) - लोकेश राहुल ( कर्णधार), ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पुरन, कृष्णप्पा गोवथम, रवी बिश्नोई, दीपक हुडा, शेल्डन कोट्रेल, मोहम्मद शमी, इशान पोरेल.