दुबई : किंग्स इलेव्हन पंजाब संघाला आता मंगळवारी आपल्या पुढील लढतीत दिल्ली कॅपिटल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. किंग्स इलेव्हन गेल्या दोन सामन्यांत अनुकूल निकाल मिळविण्यात यशस्वी ठरला आहे, पण प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्यासाठी त्यांना उर्वरित पाच सामने जिंकावेच लागणार आहेत. फॉर्मात नसलेला ग्लेन मॅक्सवेल दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीतही संघात कायम राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता दिल्ली कॅपिटल्स संघ आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक यशस्वी संघ ठरला आहे.
उभय संघांदरम्यानची यापूर्वीची लढत सुपर ओव्हरपर्यंत रंगली होती आणि पुन्हा असे घडू नये असे दिल्लीच्या तुलनेत पंजाबला वाटत असेल.
मजबूत बाजू -
दिल्ली - चेन्नईविरुद्ध विजय मिळविल्यामुळे मनोधैर्य उंचावले. धवनला सूर गवसला. अक्षर पटेल फलंदाजीमध्येही यशस्वी.
पंजाब - मुंबईविरुद्ध रोमांचक विजय मिळविल्यामुळे संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. केएल राहुल व मयंक अग्रवाल शानदार फॉर्मात आहेत.
कमजोर बाजू -
दिल्ली - पृथ्वी शॉ मोठी खेळी करण्यात अपयशी. दुखापतग्रस्त ऋषभ पंतच्या स्थानी खेळत असलेल्या अजिंक्य रहाणेला सूर गवसलेला नाही.
पंजाब - डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी, ग्लेन मॅक्सवेलचा खराब फॉर्म व मधल्या फळीतील फलंदाजी.
आमने-सामने -
दिल्ली - 11
पंजाब - 14
अनिर्णित - 0
Web Title: IPL 2020 DC vs KXIP Preview: Punjab must win every match, today against Delhi Capitals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.