मुंबई - दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) यंदाच्या आपल्या Indian Premier League (IPL 2020) मोहिमेला धमाक्यात सुरुवात केली. पहिलाच सामना सुपरओव्हरमध्ये जिंकत दिल्लीकरांनी किंग्ज ईलेव्हन पंजाबला (Kings XI Punjab) पराभवाचा धक्का दिला. मात्र, या सामन्याआधीच अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा (Ishant Sharma) दुखापतग्रस्त झाल्याने दिल्लीला मोठा धक्का बसला. त्यामुळे दिल्लीने त्याच्याआधी मोहित शर्माला (Mohit Sharma) संधी दिली. परंतु, आता दिल्ली संघ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार ईशांतला पुढील दोन-तीन सामन्यांनाही मुकावे लागण्याची शक्यता आहे.दुबई येथे दिल्लीने आपला पहिला सामना पंजाबविरुद्ध खेळला होता. या सामन्यात दिल्लीने अखेरच्या क्षणी पंजाबला कसेबसे बरोबरीत रोखले आणि सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्ये मात्र दिल्लीने एकहाती वर्चस्व राखताना पंजाबला झुंज देण्याची संधीही दिली नाही. या सामन्यात वेगवान गोलंदाज ईशांतही कमतरता दिल्लीला चांगलीच जाणवली.आता ईशांत पुढील काही सामन्यांतही खेळू शकणार नसल्याची माहिती दिल्ली संघ व्यवस्थापनाकडून मिळाली आहे. ईशांतला दुखापतीतून सावरण्यासाठी पूर्ण वेळ देण्याचे दिल्ली संघव्यवस्थापनाने ठरविले आहे. ईशांत दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असून घाई करुन त्याला मैदानावर उतरविण्याची चूक दिल्ली संघ करणार नाही. संघ व्यवस्थापनातील एका अधिकाºयाने माहिती दिली की, ‘ईशांतला बॅक स्पॅस्म झाले असून तो सध्या तरी खेळू शकणार नाही. यंदाचे पूर्ण सत्र आणि येथील वातावरण पाहता ईशांतला खेळविण्याची कोणतीही घाई करणार नाही. त्याला पाहिजे तितका वेळ देण्यात येईल आणि यामुळे त्याला आणखी एक किंवा दोन सामन्यांना मुकावे लागेल. स्पर्धेला आता कुठे सुरुवात झाली असून मध्यावर किंवा अंतिम टप्प्यासाठी तो संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2020 : दिल्लीचा ‘हा’ वेगवान गोलंदाज अजूनही संघाबाहेरच राहणार
IPL 2020 : दिल्लीचा ‘हा’ वेगवान गोलंदाज अजूनही संघाबाहेरच राहणार
पहिलाच सामना सुपरओव्हरमध्ये जिंकत दिल्लीकरांनी किंग्ज ईलेव्हन पंजाबला (Kings XI Punjab) पराभवाचा धक्का दिला होता.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 3:18 PM