IPL 2020: मुंबईविरुद्ध पराभव पत्करताच दिल्लीच्या नावावर जमा झाला नकोसा विक्रम

IPL 2020 DC joins Losers Hundred Club: शतक हवेसे आणि शतक नकोसे, यशापयशाचा अनोखा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 03:36 PM2020-10-12T15:36:24+5:302020-10-12T15:37:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 Delhi records their 100th defeat in ipl after loosing against mumbai indians | IPL 2020: मुंबईविरुद्ध पराभव पत्करताच दिल्लीच्या नावावर जमा झाला नकोसा विक्रम

IPL 2020: मुंबईविरुद्ध पराभव पत्करताच दिल्लीच्या नावावर जमा झाला नकोसा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- ललित झांबरे

क्रिकेटमध्ये शतकाला फार महत्त्व आणि शतक म्हणजे गौरवाची बाब. पण प्रत्येकच शतक तसे असते असे नाही. काही शतकं नकोशीसुध्दा असतात.असेच नकोसे शतक दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर लागले आहे. मुंबई इंडियन्सविरुध्द रविवारी त्यांनी जो सामना गमावला तो त्यांचा आयपीएलमधील 100 वा पराभव होता. मात्र आयपीएलमध्ये हे असले शतक करणारा दिल्ली कॅपिटल्स हा काही पहिलाच संघ नाही. त्यांच्या एकच दिवस आधी किंग्ज इलेव्हन पंजाबने 'आयपीएल लाॕसेस हंड्रेड क्लब'ची सुरुवात केली होती. दिल्लीचा संघ हा या क्लबचा दुसरा सदस्य ठरला. त्यामुळे हे दोन्ही संघ आतापर्यंत एकही आयपीएल जिंकू शकलेले नाहीत यात आश्चर्य नाही.

याच्या उलट 'आयपीएल विनर्स हंड्रेड क्लब'सुध्दा आहे आणि त्यात अर्थातच त्यांच्या विजेतेपदांच्या यशानुसार मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज हे दोन सदस्य आहेत.

यंदा दिल्लीचा संघ फाॕर्मात असून तो आपल्या आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल असे म्हटले जातेय. पण रविवारी मुंबईकर त्यांना भारी पडले. त्याआधी पंजाबला शनिवारी केकेआरने मात दिली आणि हरण्याचे शतक अशी विक्रमाची नवी श्रेणी सुरु झाली.

लूजर्स हंड्रेड क्लब

वर्षदिल्ली कॅपिटल्सकिंग्ज इलेव्हन पंजाब
२००८
२००९
२०१०१०
२०११

 

 

२०१२
२०१३१३
२०१४१२
२०१५११
२०१६१०
२०१७
२०१८
२०१९
२०२०
एकूण१००१००


विनर्स हंड्रेड क्लब

वर्षचेन्नई सुपर किंग्जमुंबई इंडियन्स
२००८
२००९
२०१०११
२०१११११०
२०१२१०१०
२०१३१२१३
२०१४१०
२०१५१०१०
२०१६-
२०१७-१२
२०१८११
२०१९१०११
२०२०
एकूण१०२११४

(फिक्सिंग प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईमुळे चेन्नईचा संघ २०१६, २०१७ मध्ये खेळू शकला नव्हता.)

Web Title: IPL 2020 Delhi records their 100th defeat in ipl after loosing against mumbai indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.