Join us  

IPL 2020: सुरेश रैनामुळे मिळाली धोनीला विक्रमी संधी!

 कमी धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचे आव्हान ७ गड्यांनी परतावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 3:32 PM

Open in App

मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) संघाचे आव्हान जवळपास संपल्यात जमा झाले आहे. आता चेन्नईचे केवळ ४ सामने शिल्लक असून गुणतालिकेत ते तळाला आहेत. हे चारही सामने त्यांनी जिंकले, तरी त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. शिवाय त्याचवेळी त्यांना इतर संघांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागले.

स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच सीएसके प्ले ऑफपासून दूर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नईला राजस्थान रॉयल्सकडून मोठा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात धोनीने (MS Dhoni)  विक्रमी कामगिरी करत आयपीएलमध्ये २००वा सामना खेळला. मात्र ही त्याला संधी मिळाली ती सुरेश रैनामुळे (Suresh Raina).

 कमी धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचे आव्हान ७ गड्यांनी परतावले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाºया चेन्नईला राजस्थानने ५ बाद १२५ धावांवर रोखले. यानंतर धावांचा पाठलाग करताना राजस्थानचीही ३ बाद २८ धावा अशी अवस्था झाली होती. मात्र स्टीव्ह स्मिथ-जोस बटलर या अनुभवी जोडीने संयमी नाबाद ९८ धावांची भागीदारी करत राजस्थानच्या विजयावर शिक्का मारला.

चेन्नईचा पराभव झाल असला, तरी या सामन्यात गाजला तो धोनी. आयपीएलमध्ये २०० सामना खेळणारा धोनी पहिला क्रिकेटपटू ठरला. मात्र हा विक्रम त्याला नशीबानेच मिळाला असे म्हणावे लागेल. याला कारण म्हणजे सुरेश रैना. सुरेश रैना यंदाच्या सत्रासाठी यूएईमध्ये सुरुवातीला आला होता. मात्र नंतर वैयक्तिक कारण देऊन त्याने आयपीएलमधून माघार घेतली. यानंतर सीएसकेकडूनही रैना यंदा एकही सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

रैनाने आतापर्यंत १९३ आयपीएल सामने खेळले आहेत. जर रैना यंदाच्या सत्रात खेळला असता, तर आतापर्यंत त्याच्या नावावर २०३ सामने झाले असते आणि धोनी २०० आयपीएल सामने खेळणारा दुसरा क्रिकेटपटू ठरला असता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याच्या यादीत दुसºया स्थानी असून त्याने १९७ सामने खेळले आहेत. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसुरेश रैनाIPL 2020