Join us  

IPL 2020 : पंजाबसाठी ‘करा अथवा मरा’; चेन्नईसाठी प्रतिष्ठा राखणारी लढत

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७ गड्यांनी पराभूत झाल्यामुळे पंजाबच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. केएल राहुलच्या संघाने सलग पाच सामने जिंकत प्ले ऑफसाठी दावेदारी सादर केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 6:06 AM

Open in App

अबूधाबी : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाला शनिवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय मिळवावा लागेल तर चेन्नई संघ या लढतीत प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७ गड्यांनी पराभूत झाल्यामुळे पंजाबच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. केएल राहुलच्या संघाने सलग पाच सामने जिंकत प्ले ऑफसाठी दावेदारी सादर केली होती. गेल्या लढतीतील पराभवानंतर पंजाबचे भविष्य मात्र अधांतरी झाले आहे. चेन्नईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांना प्ले ऑफसाठी अन्य सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. जर सनरायजर्स हैदराबादने (१२ सामने १० गुण) दोन्ही सामने जिंकले आणि दिल्ली कॅपिटल्स (१४) व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (१४) यांच्यादरम्यानच्या लढतीतील विजेत्या संघाचे १६ गुण होतील. अशा परिस्थितीत गुण किंवा नेटरनरेटच्या आधारावर पंजाब पात्र ठरू शकते. 

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाब