-ललित झांबरे
दुबई (Dubai) येथे चेन्नईच्या (CSK) विजयात जे खेळाडू मंगळवारी चमकले त्यात ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) हा एक होता. डेथ ओव्हर्समध्ये त्याने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, तीन षटकात फक्त 25 धावा देत दोन गडी बाद केले आणि शेवटच्या षटकात सनरायजर्सच्या (SRH) फलंदाजांना फक्त एकच धाव घेऊ दिली त्याच्याने सीएसकेच्या विजयात तोसुध्दा महत्वाचे योगदान देणारा ठरला.
या सामन्यात दोन विकेट काढून ब्राव्होने आपले सातत्य कायम राखले आहे. सातत्याने विकेट काढण्यात केवळ लसिथ मलिंगाच त्याच्यापुढे आहे. आयपीएलमधील 139 सामन्यात ब्राव्होच्या नावावर 152 विकेट आहेत. यात सामन्यात चार विकेट त्याने दोनदा काढल्या आहेत आणि सामन्यात किमान दोन तरी विकेट त्याने तब्बल 47 वेळा काढल्या आहेत. लसिथ मलिंगाने 52 सामन्यात किमान 2 विकेट काढल्या आहेत तर हरभजन व अमीत मिश्राने अशीच कामगिरी 43 सामन्यात केली आहे.
दोन विकेट सर्वाधिक वेळा काढताना दुसऱ्या स्थानी असलेला ब्राव्हो सर्वाधिक सलग सामन्यात किमान एकतरी विकेट काढण्यात नंबर वन आहे. 2012 ते 15 दरम्यान सलग 27 सामन्यात त्याने किमान एकतरी विकेट काढली होती.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा किमान दोन विकेट घेणारे गोलंदाज
लसिथ मलिंगा- 52
ड्वेन ब्राव्हो- 47
हरभजन सिंग- 43
अमित मिश्रा- 43
भुवनेश्वर कुमार- 42
पियुष चावला- 38
ब्राव्होची सिझननिहाय कामगिरी
वर्ष --- सामने --- विकेट
2020- 5 ------- 5
2019- 12 ------ 11
2018- 16 ------ 14
2016- 15 ------ 17
2015- 17 ------ 26
2014- 1 -------- 0
2013- 18 ------ 32
2012- 19 -------15
2011- 6 -------- 6
2010- 10 ------- 4
2009- 11 ------- 11
2008- 9 --------- 11