इंडियन प्रीमिअर लीग 2020चा ( आयपीएल 2020) उद्धाटनीय सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. 29 मार्चपासून यंदाच्या मोसमाला सुरुवात होणार असून पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावरून आयपीएल 2020च्या जेतेपदाच्या शर्यतीचा श्रीगणेशा करणार आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्स हैदराबादला सनरायझर्स हैदराबादचा सामना करण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर पुन्हा 5 एप्रिलला घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूशी मुकाबला करेल.
मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना
त्यानंतर संघ किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स असे दोन अवे सामने खेळेल. त्यानंतर घरच्या मैदानावर सलग दोन सामने राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्याशी होतील. आयपीएलची चार जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध परतीचा सामना खेळण्यासाठी चेपॉकला रवाना होणार आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या बर्थ डेला म्हणजेच 24 एप्रिलला हा सामना होणार आहे. 2012 आणि 2014च्या आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स 28 एप्रिलला मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर सामना करणार आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स 1 मे रोजी वानखेडेवर मुंबई इंडियन्सशी भिडतील. मुंबई आणि दिल्ली यांच्यात 6 मे रोजी परतीचा सामना होईल. सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 9 मे रोजी परतीचा सामना होईल.
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, हार्दिक शर्मा, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.
असं असेल मुंबई इंडियन्सचं वेळापत्रक
वि. चेन्नई सुपर किंग्स - 29 मार्च ( होम) आणि 24 एप्रिल ( अवे)
वि. रॉयल चॅलेंजर्स - 5 एप्रिल ( होम) आणि 17 मे ( अवे)
वि. सनरायझर्स हैदराबाद - 9 मे ( होम) आणि 1 एप्रिल ( अवे)
वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 20 एप्रिल ( होम) आणि 8 एप्रिल ( अवे)
वि. कोलकाता नाईट रायडर्स - 28 एप्रिल ( होम) आणि 12 एप्रिल ( अवे)
वि. राजस्थान रॉयल्स - 15 एप्रिल ( होम) आणि 11 मे ( अवे)
वि. दिल्ली कॅपिटल्स - 1 मे ( होम) आणि 6 मे ( अवे)
Web Title: IPL 2020: Entire schedule of Mumbai Indians in one click, Where are MI playing on sachin tendulkar's birthday?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.