मुंबई : आज Indian Premier League (IPL 2020) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) सामना बलाढ्य आणि जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) होणार आहे. मुंबईने संपूर्ण स्पर्धेत केकेआरवर एकतर्फी वर्चस्व राखले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर दडपण असणार. शिवाय यंदाच्या सत्राची सुरुवात करताना केकेआरला आपल्या पहिल्या सामन्यातही मुंबईविरुद्धच पराभव पत्करावा लागला होता. मात्र आता केकेआरच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कारण कर्णधार दिनेश कार्तिक(Dinesh Karthik) याने काही कारणास्तव संघाचे नेतृत्त्व सोडले असून त्याने संघाची धुरा विश्वविजेत्या कर्णधाराकडे सोपविली आहे.
गुणतालिकेत कोलकाता सध्या पाचव्या स्थानावर असून त्यांनी ७ सामन्यांपैकी ४ सामने जिंकताना ३ सामने गमावले आहेत. केकआर आज मुंबई इंडियन्सविरुद्ध सज्ज होत असतानाच केकेआर संघ व्यवस्थापनाने मोठी बातमी देताना कार्तिकने संघाचे नेतृत्त्व सोडल्याची माहिती दिली.
केकेआरने ही माहिती दिल्यानंतर सोशल मीडीयावरही हे वृत्त चांगलेच व्हायरल झाले. केकेआर संघ व्यवस्थापनाने माहिती दिली की, ‘विद्यमान कर्णधार दिनेश कार्तिकने आपले कर्णधारपद इयॉन मॉर्गन याच्याकडे सोपविले आहे. कार्तिकने संघाच्या व्यवस्थापनाला माहिती दिली की, आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याासाठी आणि संघाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी त्याने इयॉन मॉर्गनकडे कर्णधारपद सोपविले आहे.’
यंदाच्या सत्राच्या कार्तिकची वैयक्तिक कामगिरी म्हणावी तशी चांगली झालेली नाही. त्याने यंदाच्या मोसमात केवळ एकदाच अर्धशतकी खेळी केली आहे. मात्र या खेळीचा अपवाद वगळता त्याला फार छाप पाडता आली नाही.
Web Title: IPL 2020 Eoin Morgan appointed KKR captain after Dinesh Karthik steps aside
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.