मुंबई: चेन्नई सुपरकिंग्जला (Chennai Superkigs) शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) मोठा पराभव पत्करावा लागला. यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये हा चेन्नईचा सलग दुसरा पराभव ठरला, तर दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवताना गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. दिल्लीने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचे सर्वच फलंदाज अपयशी ठरले. अपवाद राहिला तो फाफ डूप्लेसिसचा (Faf duplesis) . त्याने ३५ चेंडूंत ४३ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. याशिवाय त्याने या सामन्यात विक्रमी कामगिरीही केली, परंतु त्यानंतरही चेन्नईचा पराभव झाला.
दिल्लीने १७५ धावा उभारल्यानंतर चेन्नईला सुरुवातीपासून आवश्यक धावगती राखण्यात यश आले नाही. वरच्या स्थानावर फलदाजीला आलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनीही फार काही करु शकला नाही. अनुभवी फाफ डूप्लेसिस (४३) याने एकाकी झुंज दिली. त्याला दोनवेळा जीवदानही मिळाले, मात्र याचा फायदा तो घेऊ शकला नाही.
फाफ डूप्लेसिसने या सामन्यात २००० धावांचा पल्ला पार केला. त्याने ६७ आयपीएल डावांमध्ये २ हजार धावा पूर्ण करताना चौथ्या क्रमांकाच्या वेगवान विदेशी फलंदाजाचा मान मिळवला. त्याच्याआधी अशी कामगिरी ख्रिस गेल, शॉन मार्श आणि शेन वॉटसन यांनी केली होती. गेलने केवळ ४८ डावांमध्ये, तर मार्श आणि वॉटसन यांनी अनुक्रमे ५२ आणि ६५ डावांमध्ये २ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी फाफ डूप्लेसिसने सलग दोन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. या अपेक्षा
फाफ डूप्लेसिसने पूर्णही केल्या, मात्र त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये २ हजार धावा पूर्ण करणारा प्लेसिस चौथा दक्षिण आफ्रिकन फलंदाज ठरला. याआधी एबी डीव्हिलियर्स (४४७४ धावा), जॅक कॅलिस (२४२७) आणि जेपी ड्युमिनी (२०२९) या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आयपीएलमध्ये २ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
Web Title: IPL 2020: Faf Duplessis set a record; Became the fourth fastest foreign batsman
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.