इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) 2020तील हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत. या हंगामासाठी कोलकाता येथे महिन्याभरापूर्वी खेळाडूंचा लिलाव झाला. सहभागी संघांनी तोडीसतोड खेळाडूंची निवड करून 2020च्या जेतेपदासाठी दंड थोपटले आहेत. या लीगसाठी सर्वकाही सेट झालं आहे, परंतु स्पर्धेची तारीख अजूनही गुलदस्त्यात आहे.
पण, सुत्रांच्या माहितीनुसार आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची अंतिम तारीख ठरली आहे आणि त्याची लवकरच घोषणा करण्यात येईल. आयपीएलचा यंदाचा हंगाम 29 मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना 24 मे रोजी मुंबईत होणार आहे. यंदाची लीग ही 45 एवजी 57 दिवसांची खेळवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदाच्या लीगमध्ये काही बदल पाहायला मिळतील, असे संकेत दिले जात होते. त्यात मुख्य म्हणजे सामन्याची वेळ आणि डबल हेडर मुकाबला, हे मुद्दे होते.
''अजून संपूर्ण वेळापत्रक तयार झालेले नाही. यंदाची लीग 29 मार्चला सुरू होणार असून अंतिम सामना 24 मे रोजी खेळवण्यात येईल. यंदाची लीग ही 45 दिवसांपेक्षा अधिक काळ चालणारी आहे. त्यामुळे एका दिवसाला एक सामना खेळवण्यास काहीच हरकत नाही,''असे सूत्रांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की,''TRP महत्त्वाचे आहेच, पण त्याचबरोबर सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुरू असेपर्यंत सामना संपवून प्रेक्षकांना घरी जाण्यास कोणतिही अडचण होणार नाही, याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे सामना 7.30 वाजता सुरू करण्याचा प्रयत्न असेल.''
Web Title: IPL 2020 final date revealed, no double headers in upcoming season: Reports
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.