इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामना दुबईत सुरू आहे. चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)समोर दिल्ली कॅपिटल्सचे ( Delhi Capitals) आव्हान आहे. DCनं पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. MIनं यापूर्वी पाचपैकी चार वेळा ( २०१० वगळता) आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे मुंबईची ही घोडदौड दिल्ली रोखेल का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दिल्लीच्या संघाला रोखण्यासाठी MIकर्णधार रोहित शर्मानं संघात बदल करून मोठा डाव खेळला. मुंबईनं यंदाच्या आयपीएलमध्ये १५ विकेट्स घेणाऱ्या राहुल चहरला बाहेर बसवून जयंत यादवला अंतिम ११मध्ये स्थान दिले. दिल्लीच्या संघात डावखुरे फलंदाज अधिक असल्यानं हा बदल केल्याचे रोहितनं सांगितलं. मार्कस स्टॉयनिस व शिखर धवन हे सलामीला आले आणि ट्रेंट बोल्टनं पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसला यष्टिरक्षक क्विंटन डी'कॉकला माघारी पाठवून दिल्लीला मोठा धक्का दिला. ट्रेंट बोल्टनं DCला आणखी एक धक्का देताना अजिंक्य रहाणेला ( २) बाद केले.
फायनलमध्ये अंतिम ११मध्ये स्थान मिळवलेल्या जयंत यादवला ( Jayant Yadav) चौथे षटक दिले आणि त्यानं त्या षटकात शिखर धवनला ( १५) बाद केले. ट्रेंट बोल्टनं पॉवर प्लेमध्ये दोन विकेट्स घेत मिचेल जॉन्सनच्या २०१३च्या विक्रमाशी बरोबरी केली. पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक १६ विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर केला. शिवाय आयपीएलच्या फायनलमध्ये प्रथमच पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रसंग घडला.
पाहा विकेट्स.,