इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामना आज दुबईत होणार आहे. चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)समोर दिल्ली कॅपिटल्सचे ( Delhi Capitals) आव्हान आहे. DCनं पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. MIनं यापूर्वी पाचपैकी चार वेळा ( २०१० वगळता) आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे मुंबईची ही घोडदौड दिल्ली रोखेल का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पण, आजचा हा सामना शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नावावर वेगळाच विक्रम नोंदवणार आहे.
शिखर धवन आज चौथ्यांदा आयपीएल अंतिम सामना खेळणार आहे. तीन वेगवेगळ्या संघाकडून आयपीएल फायनल खेळणारा तिसरा खेळाडू आहे. धवननं यापूर्वी मुंबई इंडियन्स ( २०१०), सनरायझर्स हैदराबाद ( २०१६ व २०१८) यांच्याकडून आयपीएल फायनल खेळली होती. त्याच्याआधी शेन वॉटसन ( राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स) व युसूफ पठाण ( राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद) यांनी हा विक्रम केला आहे.