- रोहित नाईक यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मधील सर्वात समतोल संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गतविजेत्याच्या थाटात कामगिरी करताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. सलग दुसºया जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या मुंबईपुढे आव्हान आहे ते दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals). एकीकडे दिल्लीने पहिल्यांदाच आयपीएलची अंतिम फेरी गाठली असून मुंबईने मात्र विक्रमी सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यातही मुंबईने चारवेळा जेतेपद पटकावले असून यंदाही त्यांचे पारडे वरचढ मानले जात आहे. त्याचवेळी दिल्लीचा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मुंबईविरुद्ध अंतिम सामना खेळणारा केवळ तिसरा कर्णधार ठरणार आहे.आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ अशी चार वर्षे जेतेपदावर कब्जा केले. २०१३ च्या आधीही म्हणजेच २०१० साली मुंबईने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यावेळी त्यांना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध २२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. चेन्नईच्या १६८ धावांचा पाठलाग करताना मुंबईला केवळ १४६ धावाच करता आलेल्या.
यानंतर मात्र मुंबईने एकदाही अंतिम सामना गमावलेला नाही, हे विशेष. २०१३ साली दुसºयांदा अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर मुंबईने चेन्नईचा २३ धावांनी पराभव करत २०१० सालचा वचपा काढला. यानंतर २०१५ साली मुंबईने अंतिम फेरीत पुन्हा एकदा चेन्नईला धक्का दिला आणि त्यांचा तब्बल ४१ धावांनी धुव्वा उडवला.२०१७ सालच्या अंतिम सामन्यात मुंबईने थरारक विजय मिळवताना रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा अवघ्या एका धावेने पराभव केला होता. असाच रोमांचक विजय मुंबईने २०१९ सालच्या अंतिम सामन्यात मिळवला. चेन्नईचा अखेरच्या चेंडूवर पराभव करत मुंबईने पुन्हा एकदा एका धावेने थरारक विजयासह चौथे जेतेपद उंचावले.
आता या सर्व अंतिम सामन्यांवर नजर टाकल्यास लक्षात येईल की, २०१७ सालचा अंतिम सामना सोडल्यास इतर सर्व अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी कर्णधार होता महेंद्रसिंग धोनी. २०१७ साली मुंबईविरुद्ध स्टीव्ह स्मिथने पुण्याचे नेतृत्त्व केले होते. त्यामुळेच आता अय्यरच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला जाणार आहे. त्यामुळेच यंदा मुंबईने सहाव्यांदा अंतिम फेरी गाठली असली, तरी त्यांच्यासमोर श्रेयस अय्यरच्या रुपाने केवळ तिसरा कर्णधार उभा असेल.
मुंबई इंडियन्सने खेळलेले अंतिम सामने -
२०१० : मुंबई इंडियन्स उपविजेतेचेन्नई सुपरकिंग्ज ५ बाद १६८ वि.वि. मुंबई ९ बाद १४६
२०१३ : मुंबई इंडियन्स विजेतेमुंबई ९ बाद १४८ वि.वि. चेन्नई ९ बाद १२५.
२०१५ : मुंबई इंडियन्स विजेते.मुंबई ५ बाद २०२ वि.वि. चेन्नई ८ बाद १६१.
२०१७ : मुंबई इंडियन्स विजेते.मुंबई ८ बाद १२९ वि.वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स ६ बाद १२८.
२०१९ : मुंबई इंडियन्स विजेते.मुंबई ८ बाद १४९ वि. वि. चेन्नई ७ बाद १४८.