Join us  

IPL 2020 : मुंबईला पहिली बॅटिंग मिळणं दिल्लीसाठी धोक्याचं, कारण...

IPL 2020 : मुंबईसाठी प्रथम फलंदाजी करुन प्रतिस्पर्ध्यासमोर मोठे टारगेट ठेवणे हे एवढे लकी आहे की 2017 व 2019 चा अंतिम सामना त्यांनी फक्त एका धावेने जिंकला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 11:31 AM

Open in App
ठळक मुद्देआता यंदाच्या अंतिम सामन्यातही मुंबईने जर प्रथम फलंदाजी केली तर ते पुन्हा एकदा विजेतेपदावर आपले नाव कोरु शकतात. 

- ललित झांबरे 

आयपीएलमध्ये (IPL)  मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians)  संघ सहाव्यांदा अंतिम सामना खेळतोय. याआधीच्या पाच सामन्यात चार विजय आणि एक पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. या निकालाचे वैशिष्ट्य बघाल तर मुंबईने जिंकलेले चारही अंतिम सामने प्रथम फलंदाजी करुन जिंकले आहेत.

योगायोगाने हे चारही सामने विषम संख्यांच्या वर्षी होते (2013, 15, 17 आणि 2019). मात्र एकदाच जेव्हा त्यांनी अंतिम सामन्यात लक्ष्याचा पाठलाग केला आणि सम संख्येच्या वर्षी ते खेळले (2010) त्यावर्षी त्यांना अपयश आले होते. त्यामुळे आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात आता मुंबईने जर प्रथम फलंदाजी केली तर सम संख्येच्या वर्षी सुद्धा ते जिंकू शकतात.

मुंबईसाठी प्रथम फलंदाजी करुन प्रतिस्पर्ध्यासमोर मोठे टारगेट ठेवणे हे एवढे लकी आहे की 2017 व 2019 चा अंतिम सामना त्यांनी फक्त एका धावेने जिंकला होता. दिल्लीविरुद्धचा  शेवटचा सामनासुध्दा त्यांनी प्रथम फलंदाजी करुनच जिंकलेला आहे. त्यामुळे आता यंदाच्या अंतिम सामन्यातही मुंबईने जर प्रथम फलंदाजी केली तर ते पुन्हा एकदा विजेतेपदावर आपले नाव कोरु शकतात. 

2010 मध्ये मुंबईला चेन्नईने 169 धावांचे आव्हान दिले होते पण ते 9 बाद 146 धावा करु शकले होते. मात्र त्यानंतर मुंबईने अंतिम सामन्यांमध्ये जे 80 टक्के यश मिळवलेले आहे. त्यात 2013 मध्ये 9 बाद 148 धावा केल्यावर त्यांनी 23 धावांनी विजय मिळवला होता. 2015 मध्ये त्यांची 5 बाद 202 ही धावसंख्या सीएसकेसाठी 41 धावांनी महागडी ठरली होती.

2017 मध्ये 8 बाद 129 आणि 2019 मध्ये 8 बाद 149 धावा केल्यावर ते फक्त एका धावेने अनुक्रमे रायाझिंग पुणे व सीएसकेला भारी पडले होते. त्यामुळे आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सची प्रथम फलंदाजी त्यांच्या यशाची गॕरंटी असते असे म्हणता येईल. 

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स