इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमावर Corona Virus आणि फ्रँचायझी मालकांचे बंड असे दुहेरी संकट आले आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने गेल्या आठवड्यात घेतलेल्या एका निर्णयाविरोधात सर्वच्या सर्व आठ फ्रँचायझी मालक एकवटले आहेत. त्या सर्वांनी एका पत्रावर स्वाक्षरी करून आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलला आपली नाराजी प्रकट केली आहे. आयपीएलमध्ये यंदाच्या विजेत्या संघासह प्ले ऑफपर्यंत मजल मारणाऱ्या टीमच्या बक्षीस रकमेत ५०% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याविरोधात शाहरुख खान ( कोलकाता नाईट रायडर्स सह मालक), आकाश अंबानी ( मुंबई इंडियन्स), कासी विश्वनाथन ( चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी ) आणि पार्थ जिंदाल ( दिल्ली कॅपिटल्स) यांनी स्वाक्षरी केलेले पत्र पाठवले आहे.
विराट कोहलीच्या RCBला मोठा धक्का, राज्य सरकारचा स्पर्धा आयोजनास नकार!
आयपीएलमधील यंदा विजेत्या संघाला १० कोटी बक्षीस म्हणून मिळतील. २०१९च्या विजेत्या संघाला २० कोटी देण्यात आले होते. उपविजेत्या संघाला १२.५ कोटी ऐवजी ६.२५ कोटी देण्यात येणार आहेत. क्वालिफायर सामन्यातील दोन संघांना प्रत्येकी ४.३७ कोटी रुपये मिळणार आहेत. प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या चार संघांमध्ये ५० कोटी बक्षीस रक्कम विभागली जाते. २०१४च्या मोसमापासून फ्रँचायझी मालकांना आर्थिक मदत मिळावी म्हणून बीसीसीआयनं बक्षीस रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
बक्षीस कपातीशिवाय आयपीएलने आणखी एक निर्णय घेतला. त्यात राज्य संघटनांना सामना आयोजनासाठी फ्रँचायझी मालकांना आता ३० लाखांएवजी ५० लाख द्यावे लागणार आहेत. पण, बक्षीस कपातीचा निर्णय घेताना आयपीएलनं फ्रँचायझी मालकांना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे संघ मालकांमध्ये नाराजी आहे. आयपीएलचे हे निर्णय म्हणजे मनमानी कारभार असल्याची टीका फ्रँचायझी मालकांनी केली. हा निर्णय घेताना आयपीएलने आम्हाला विश्वासात न घेतल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हे दोन निर्णय तुर्तात स्थगित करावेत, अशा आशयाचा मेल आयपीएलला करण्यात आला आहे.
''राज्य संघटनेला देण्यात येणाऱ्या रकमेत ६६% टक्के वाढ आणि बक्षीस रकमेत ५०% कपात, याकडे आम्ही तुमचे लक्ष वेधू इच्छितो,'' हा मुद्दा उपस्थित करणारे पत्र फ्रँचायझी मालकांच्या स्वाक्षरीसह मेल करण्यात आले आहे. ''सध्याचे मीडिया राईट्स डिल संपेपर्यंत गव्हर्निंग काऊंसिलने घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि कोणताही निर्णय घेताला फ्रँचायझी मालकांना विश्वासात घ्यावे,'' असेही त्यात नमूद केले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...रंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग, हार्दिक-नताशा रंगले प्रेमाच्या रंगात!
Corona Virus मुळे Asia XI vs World XI सामने रद्द? बीसीसीआयचे संकेत
Mumbai Indiansच्या अष्टपैलू खेळाडूला दुखापत, ट्वेंटी-२० लीगमधून माघार
WADAला धक्का; आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला द्यावी लागली साडेतीन कोटींची भरपाई