Join us  

IPL 2020 त सुरू झाला नवा वाद; दुजाभाव झाल्याच्या आरोपावरून फ्रँचायझींचा थेट BCCIवर वार!

IPL 2020: Indian Premier League ( IPL 2020) म्हटलं की वाद हे आलेच...

By स्वदेश घाणेकर | Published: September 21, 2020 7:11 PM

Open in App

यंदाच्या IPL 2020मध्ये तर दुसऱ्याच सामन्यापासून वादाला सुरुवात झाली आहे. Kings XI Punjab आणि Delhi Capitals यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्ये ( Super Over) रंगला आणि त्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. पण, या सामन्यातील एक निर्णय किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( KXIP) विरोधात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. 19व्या षटकात पंचांनी दिलेला Short Run चा निर्णय चुकीचा असल्याने वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण आणि KXIPची सहमालकीण प्रिती झिंटा यांनी टीका केली आहे. त्यात आता आणखी एक वाद समोर येत आहे. काही फ्रँचायझींनी BCCIवर गंभीर आरोप केले आहेत. ( IPL 2020 Live Updates, Click here)  

 ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा KXIPला फटका; वीरू, इरफाननं काढले जाहीर वाभाडे!

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर IPL 2020 UAEत खेळवण्याचा निर्णय झाला. त्यासाठी कडक नियमावलीच BCCIने तयार केली. त्यामुळे UAEत दाखल होणाऱ्या प्रत्येक फ्रँचायझींना त्यांच्या खेळाडू व सपोर्ट स्टाफला 6 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहणे बंधनकारक होते. त्यानुसार सर्वांनी त्याची पूर्तता केली. पण, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेसह कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये खेळणारे परदेशी खेळाडू UAEत उशीरानं दाखल झाले. त्यामुळे काही संघांना पहिल्या सामन्यात परदेशी खेळाडूंविना मैदानावर उतरावे लागणार आहे. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. मँचेस्टरवरून दुबईला आलेल्या 21 खेळाडूंसाठी क्वारंटाईन कालावधी कमी केल्यानं नवा वाद सुरू झाला आहे.  

''आमच्या संघांतील प्रत्येक खेळाडूच्या व सपोर्ट स्टाफ सदस्याच्या सुरक्षिततेसाठी आम्ही एवढा पैसा खर्च केला. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेतील दोन खेळाडू CSKचे सदस्य आहेत. 36 तासांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करण्यापूर्वी जोश हेझलवूड आणि सॅम कुरन यांनी अबु धाबीसाठी दोन तासाच बसमधून प्रवास केला. त्यांच्यात काही लक्षणे असतील, तर या दोन तासांत ती अन्य खेळाडूंनाही लागण झाली असती. त्यांची सुरक्षितता धोक्यात घातली गेली,''असे सूत्रांनी TimesNowNews.com ला सांगितले. हेझलवूड व कुरन यांनी 36 तासांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला नाही. 

''BCCIची भूमिक दुटप्पी वाटते. अन्य फ्रँचायझींना त्यांनी क्वारंटाईन नियमांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले. परंतु काही खेळाडूंसाठी 36 तासांचा क्वारंटाईन कालावधी केला गेला आणि तो पूर्ण न करताही त्यांना खेळण्याची मुभा दिली. स्थानिक सामन्याच्या वेळेनुसार त्यांनी हे 36 तास मोजले, परंतु सामन्यापूर्वी 4 तास आधी खेळाडूंना स्टेडियमवर हजर राहणे अपेक्षित असते. त्यामुळे हेझलवूड व कुरन यांनी 36 तासांचा क्वारंटाईनही पूर्ण केला नाही,''असेही सूत्रांनी सांगितले. जोस बटलर सक्तिच्या क्वारंटाईनमध्येराजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर जोस बटलरला यूएईमध्ये क्वारंटाईन करण्यात आल्यामुळे तो पहिला सामना खेळणार नसल्याची माहिती खुद्द स्वत:नेच दिली आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या वडिलांना ब्रेन कॅन्सरचं निदान झालं आहे. त्यामुळे बेन स्टोक्स आपल्या कुटुंबासोबत क्राइस्टचर्चमध्ये आहे. त्यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात तो उपलब्ध नसणार आहे.

अन्य म्हत्त्वाच्या बातम्या 

तीव्र वेदनेनं मैदान सोडणारा आर अश्विन पुढील सामन्यात खेळणार, पण...

राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार 

नशीब! मॅक्क्युलमला बॉलिंग करावी लागणार नाही; सांगतोय सर्वात महागडा बॉलर  

सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद 

मैदानावर उतरण्यापूर्वीच RCBनं चाहत्यांना जिंकले; क्रीडाविश्वातूनही होतंय कौतुक

विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यांनी बदललं स्वतःचं नाव, जाणून घ्या कारण

 

 

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सबीसीसीआयकोरोना वायरस बातम्या