मुंबई - Indian Premier League (IPL 2020) च्या २२व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrise Hydrabad) धमाकेदार विजय मिळवताना किंग्ज ईलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) ६९ धावांनी धुव्वा उडवला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि जॉनी बेयरस्टॉ (Jonny Bairstow) यांनी १६० धावांची जबरदस्त भागिदारी करत हैदराबादच्या विजयाचा पाय रचला. यानंतर गोलंदाजांनी विजयी कळस चढवताना पंजाबचा डाव केवळ १३२ धावांत संपुष्टात आणला. मात्र यावेळी पंजाबच्या निकोलस पूरनने (Nicolas Pooran) धुवाधार फटकेबाजी करत एकवेळ पंजाबच्या विजयाही आशा निर्माण केली होती आणि त्यामुळेच हैदराबादचा कर्णधार वॉर्नरला घामही फुटला होता. सामन्यानंतर स्वत: वॉर्नरने याची कबुली देताना म्हटले की, ‘पूरनच्या फलंदाजीमुळे मी घाबरलो होतो.’हैदराबादने ६ बाद २०१ धावा केल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना दुस-याच षटकात मयांक अग्रवाल धावबाद झाला आणि पंजाबचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. निकोलस पूरनने यंदाच्या सत्रातील वेगवान अर्धशतक झळकावत ३७ चेंडूंत ७७ धावांचा तडाखा दिला. त्याचा अपवाद वगळता पंजाबचे इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. राशिद खानने ३, तर खलील अहमद आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी २ बळी घेत पंजाबची हवा काढली.सामन्यानंतर वॉर्नर म्हणाला की, ‘पूरन जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा मी थोडा घाबरलो होतो. बांगलादेशमध्ये मी त्याच्यासोबत खेळलो आहे. तो शानदार फलंदाजी करत होता.’ याशिवाय वॉर्नरने अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान याचेही कौतुक केले. वॉर्नर म्हणाला, ‘राशिद जागतिक स्तराचा गोलंदाज आहे आणि त्याचा समावेश संघात असणे चांगली गोष्ट आहे.’ राशिदने १२ धावांत तीन बळी घेत हैदराबादच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2020 : पूरनच्या फलंदाजीने घाबरलो होतो, पंजाबविरुद्धच्या विजयानंतर वॉर्नरची प्रतिक्रिया
IPL 2020 : पूरनच्या फलंदाजीने घाबरलो होतो, पंजाबविरुद्धच्या विजयानंतर वॉर्नरची प्रतिक्रिया
David Warner : पंजाबच्या निकोलस पूरनने (Nicolas Pooran) धुवाधार फटकेबाजी करत एकवेळ पंजाबच्या विजयाही आशा निर्माण केली होती आणि त्यामुळेच हैदराबादचा कर्णधार वॉर्नरला घामही फुटला होता.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 3:57 PM
ठळक मुद्देनिकोलस पूरनने यंदाच्या सत्रातील वेगवान अर्धशतक झळकावत ३७ चेंडूंत ७७ धावांचा तडाखा दिलापुरनचा अपवाद वगळता पंजाबचे इतर सर्व फलंदाज अपयशी ठरलेपुरनच्या फटकेबाजीने हैदराबादचा कर्णधार वॉर्नरला घामही फुटला होता