इंडियन प्रीमियर लीग (IPL) समोरील संकटे काही कमी होण्याचे नाव घेत नाहीएत. एक संकट संपले असे वाटत असतानाच आता दुसरे संकट उभे ठाकले आहे. टायटल स्पॉन्सरशिप (IPL Title Sponsor) ला नवा स्पॉन्सर मिळाला नाही तोच आता बीसीसीआयसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आईपीएल असोसिएट सेंट्रल स्पॉन्सरशिप (IPL Associate Sponsorship) मधून फ्यूचर ग्रुप (Future Group) ने हात काढून घेतले आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून फ्यूचर ग्रुप आयपीएलसोबत होता. मात्र, यंदा या लीगसोबत संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवरून फ्यूचर ग्रुपचे नाव हटविण्यात आले आहे. आता बोर्ड नवा गडी शोधायला लागला आहे. फ्यूचर ग्रुपने मध्येच आयपीएल सोडल्याने आता बीसीसीआय कंपनीवर मोठा दंड लावण्याची शक्यता आहे.
फ्यूचर ग्रुपला स्पॉन्सरशिपसाठी मोठी किंमत मोजावी लागत होती. यामुळे या कंपनीने माघार घेतली. मात्र, जेव्हा ते दंड भरण्यास तयार असतील तेव्हाच बोर्ड त्यांना जाण्याची संमती देईल, असे सुत्रांनी सांगितले. याआधी Delhi Capitals सोबत 2015 मध्ये असलेला स्पॉन्सर डायकन एअर कंडिशनिंगनेही मागे हटण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीचा तो मुख्य स्पॉन्सर होता. मात्र, टीमने जेएसडब्ल्यू ग्रुपला नवा स्पॉन्सर मिळाला होता. तर आयपीएलचा मुख्य स्पॉन्सर व्हिवो मोबाईल चीनचा असल्याने गेला होता.
व्हिवोनेही घेतली होती माघार...चीनसोबतच्या वादामुळे चिनी कंपनी व्हिवो इंडियाने आयपीएलच्या मुख्य स्पॉन्सरशिपपासून माघार घेतली होती. यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत देशातील मोठी नावं दाखल झाली होती. टाटा सन्स यांनी टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत उडी घेतल्याने तेच बाजी मारणार असे मानले जात होते. मंगळवारी अखेरच्या क्षणापर्यंत टाटा सन्सच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असा दावा केला जात होता. पण, Dream 11ने बाजी मारली. यंदाची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CPL 2020 : मुन्रो, ब्राव्हो, पोलार्डनं धू धू धुतलं; शाहरुख खानच्या संघाची विजयाची हॅटट्रिक
किम जोंग उन कोमात, बहीण उत्तर कोरियाची सत्ताधारी; माजी सहकाऱ्याचा गौप्यस्फोट
Gold Rates सोने खरेदी करायचेय? जाणून घ्या योग्य वेळ अन् साधा संधी
युद्धाचे संकेत? चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार; सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा
लय भारी! SBI ATM येणार तुमच्या दारी; केवळ व्हॉट्सअॅप मॅसेज करावा लागणार
धक्कादायक! महिलेवर 143 जणांचा बलात्कार, लैंगिक अत्याचार; 42 पानी FIR दाखल
अफाट संपत्ती! तीन किलो सोने, दोन किलो चांदी, नोटांच्या थप्प्या; टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा
65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य