दुबई : ‘चेन्नईविरुद्ध सांघिक प्रत्न फळाला आले. आयपीएलच्या या टप्प्यावर योग्यवेळी सूर गवसल्याने गुणतालिकेत मुसंडी मारण्यास मदत होईल,’ असे मत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.
५२ चेंडूत नाबाद ९० धावा ठोकून सामनावीर राहीलेल्या कोलहीमुळे आरसीबीने चेन्नईचा ३७ धावांनी पराभव केला. विराट म्हणाला,‘ही कामगिरी पूर्णपणे सांघिक होती.सुरुवातीला फलंदाजीचा विचार होता. खेळपट्टीवर थोडा त्रास झाला. मात्र लगेचच सुधारणा करीत १५० हूनन अधिक धावांचे लक्ष्य गाठले.आमचे सामने लागोपाठ असल्याने सूर गवसणे महत्त्वपूर्ण आहे.पहिल्या षटकापासून समर्पितपणे खेळाडू प्रत्येकाने योगदान दिले. या टप्प्यावर यश मिळाल्यामुळे विजयाची प्रेरणा कायम असेल, असा मला विश्वास आहे.’
‘एक लक्ष्य बाळगून वाटचाल करतो तेव्हा यश मिळतेच.डेथ ओव्हरमध्ये फटकेबाजी झाल्यास धावांची भर पडते. काल रात्री आम्ही ही बाब शिकलो. माझ्यावर सारखे दडपण येत असल्याने फलंदाजीवर परिणाम जाणवत होता,’असे विराटने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. तो म्हणाला,‘ सुरुवातीच्या सामन्यात अनावश्यक दडपण वाढले होते. यामुळे खेळाडू या नात्याने योगदान देणे कठीण झाले.सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यामुळे माझे डोळे उघडले.’तर ‘प्ले ऑफ’ गाठणे कठीणचअनुभवी आणि दिग्गज फलंदाजांनी फलंदाजीत आणखी सरस कामगिरी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करताना चेन्नई सुपरकिंग्जचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी आपला संघ असाच खेळत राहील्यास प्ले आॅफ गाठणे कठीण होईल,असा इशारा दिला. चेन्नईने सातपैकी पाच सामने गमावले असून संघात ३० वर्षांवरील वयाचे अनेक खेळाडू आहेत. त्यांचे नेतृत्व ३९ वर्षांचा धोनी करतो.