RCB vs MI Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील प्ले ऑफमधील पहिला संघ आज निश्चित झाला. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)नं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघावर सहज विजय मिळवून १६ गुणांसह प्ले ऑफमधील प्रवेश जवळपास पक्के केले. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं ( Surykumar Yadav) मॅच विनिंग खेळी करून टीम इंडियाच्या निवड समितीला सडेतोड उत्तर दिले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियात स्थान न मिळाल्याचा सूर्यकुमारनं अनोख्या पद्धतीनं निषेध व्यक्त केला. त्याच्या या कृतीवर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला सल्ला दिला.
जोश फिलिफ आणि देवदत्त पडीक्कल यांनी RCBला सावध सुरुवात करून दिली. IPL 2020 मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिफनं २४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून ३३ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली ( ९), एबी डिव्हिलियर्स ( १५) आणि शिवम दुबे ( २) अपयशी ठरले. देवदत्त ४५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकार मारून ७४ धावांवर माघारी परतला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी दमदार कमबॅक करताना RCBला २० षटकांत ६ बाद १६४ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.
प्रत्युत्तरात इशान किशन आणि क्विंटन डी'कॉक यांना मुंबई इंडियन्सला शानदार सुरुवात करून देता आली नाही. धावफलकावर ३७ धावा असताना क्विंटन ( १८) माघारी परतला. युझवेंद्र चहलनं MIच्या दुसऱ्या सलामीवीराला बाद केले. इशान किशन २५ धावांवर बाद झाला. सौरभ तिवारीला ( ५) मोहम्मद सिराजनं बाद केलं. सूर्यकुमार यादव आणि कृणाल पांड्या यांनी मुंबई इंडियन्सच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, परंतु चहलनं त्यांची ३५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली.
हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून मुंबई इंडियन्सला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. हार्दिक १७ ( २ षटकार) धावांवर माघारी परतला. ७ चेंडू ७ धावांची गरज असताना किरॉन पोलार्डनं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. सूर्यकुमारनं नंतर अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून मुंबईचा विजय पक्का केला. सूर्यकुमार ४३ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांवर नाबाद राहिला. मुंबईनं १९.१ षटकांत ५ बाद १६६ धावा करून विजय पक्का केला.
या विजयानंतर सूर्यकुमार यादवनं कोणतंही सेलिब्रेशन न करताना मै हू ना असेच निवड समितीला सूचित केले. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी त्याला सल्ला दिला.
शास्त्री म्हणाले, सूर्य नमस्कार... कणखर रहा आणि संयम ठेव...
Web Title: IPL 2020 : Great reaction from Suryakumar Yadav, Team India Head coach Ravi Shastri give advice him, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.