Join us  

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीसह CSKच्या खेळाडूंची कोरोना टेस्ट; हरभजन सिंग संघासोबत यूएईला नाही जाणार

IPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे खेळाडू संयुक्त अरब अमिरातीत दाखलही झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 5:51 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाली आहेत. किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे खेळाडू संयुक्त अरब अमिरातीत दाखलही झाले आहेत. येत्या आठवड्यात सर्व संघ यूएईत दाखल होतील. चेन्नई सुपर किंग्सचेही खेळाडू चेन्नईत पोहोचले असून या आठवड्यात तेही यूएईलासाठी रवाना होतील. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) नियमानुसार CSKच्या सर्व खेळाडूंची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. पण, संघासाठी एक वाईट बातमी म्हणजे स्टार फिरकीपटू हरभजन सिंग त्यांच्यासोबत यूएईला जाऊ शकणार नाही.

आयपीएलमधील सर्वात अनुभवी फिरकीपटू भज्जी दोन आठवड्यानंतर म्हणजेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात यूएईला दाखल होणार आहे. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार भज्जीच्या आईची प्रकृती बिघडली आहे आणि त्यामुळे तो संघासोबत जाणार नाही. दोन आठवड्यानंतर तो यूएईत दाखल होईल. धोनी आणि अन्य खेळाडू शुक्रवारी सायंकाळी यूएईत पोहोचतील. हरभजनसह रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना चेन्नईत सराव शिबिरात दाखल होता आले नव्हते. बुधवारी ठाकूर चेन्नईत दाखल झाला, तर जडेजाही आज पोहोचला आहे. खेळाडूंच्या सरावासाठी तामिळ नाडू क्रिकेट असोसिएशननं दोन खेळपट्ट्या तयार केल्या आहेत.  

खेळाडूंची कोरोना चाचणीचेन्नई व्यवस्थापनासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांच्या सर्व खेळाडूंची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. बीसीसीआयच्या नियमानुसार यूएईला रवाना होण्यापूर्वी 24 तासांत खेळाडूंची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडू यूएईला रवाना होऊ शकतील. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CPL 2020 : किप डिस्टन्स!; कोरोना व्हायरसमुळे विकेट सेलिब्रेशनची स्टाईलच बदलली, पाहा हा व्हिडीओ

अथिया शेट्टीच्या 'स्विमसूट' घातलेल्या फोटोवर लोकेश राहुलनं केलेल्या कमेंटनं चाहते चक्रावले 

महेंद्रसिंग धोनीकडून 'या' तीन गोष्टी शिकण्यासारख्या; आनंद महिंद्रा यांचं मोजक्या शब्दात कौतुक

CPL 2020 : पाकिस्तानी फलंदाजाला 'इंग्रजी' येईना, नेपाळचा गोलंदाज धावला मदतीला, Video 

विनम्रता, साधेपणा, हार-जीत, हेअरस्टाईल; पंतप्रधान मोदींचं धोनीला खास पत्र

तुझ्या निर्णयानं हर्ट झालीय, परंतु...; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर अनुष्का शेट्टीची भावनिक पोस्ट

टॅग्स :आयपीएल 2020चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीहरभजन सिंग