राजस्थान रॉयल्स विरोधातील सामना संपल्यानंतर समालोचक इयान बिशप याची मुंबई इंडियन्सचा अष्टपैलूू फलंदाज हार्दिक पांड्या याने चांगलेच ट्रोल केले आहे. हार्दिक पांड्या याने बिशपला ‘रिमेम्बर माय नेम’ असे म्हणत ट्रोल केले आहे. २०१६ टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कार्लोस ब्रेथवेट याने बेन स्टोक्सचा सलग चार षटकार लगावले आहेत. त्यानंतर इयान बिशप याने ‘ नाव लक्षात ठेवा’ असे म्हटले होते.
राजस्थान विरोधातील सामन्यात हार्दिक याने तुफानी फटकेबाजी केली. या जास्त धावा असलेल्या सामन्यात हार्दिक याने २ चौकार आणि सात षटकार लगावले. त्याने २१ चेंडूतच ६० धावा तडकावल्या. त्याच्या या खेळीने मुंबईने १९५ धावा उभारल्या मात्र हा सामना जरी राजस्थानने जिंकला असला तरी चर्चा हार्दिकच्या खेळीचीच होती. त्यानंतर सुरू असलेल्या प्रेझेंटेशनमध्ये हार्दिकने इयान बिशपल याला ‘रिमेम्बर माय नेम’ (माझे नाव लक्षात ठेवा) असे म्हणत त्याची फिरकी घेतली.
बिशप यांनी हेच वाक्य २०१६ च्या विश्वचषकानंतर उच्चारले होते. हार्दिक पांड्या याने अंकित राजपूत याला सलग चार षटकार लगावले. मुंबई इंडियन्सचेही ट्विट हार्दिकच्या चार षटकारांनंतर मुंबई इंडियन्सने देखील ट्विट केले आहे. मुंबईने म्हटले की, हार्दिकने नेमके कुणाला सलग षटकार लगावले आहेत.’ त्यावर चाहत्यांनी प्रतिक्रीया देतांना आयसीसी चॅम्पियनशीपसह या आधीच्या अनेक त्याच्या खेळींची आठवण दिली.
Web Title: IPL 2020: Hardik Pandya trolls Ian Bishop
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.