मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये तब्बल आठव्या सामन्यात पहिल्यांदा संधी मिळाल्यानंतर विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) आपला तडाखा दिलाच. त्याने किंग्ज ईलेव्हन पंजाबला (Kings XI Punjab) पुन्हा एकदा विजयी मार्गावर आणण्यात मोलाची भूमिका बजावताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध (Royal Challengers Banglore) ४५ चेंडूंत ५३ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने केवळ एक चौकार मारताना ५ उत्तुंग षटकार मारले. सामन्यानंतर त्याला आजच्या खेळीबाबत विचारण्यात आले, तेव्हाही गेलने आपल्या नेहमीच्या हटके अंदाजात प्रतिक्रिया देताना युनिव्हर्स बॉस परतला असल्याची नांदीच दिली आहे.आरसीबीविरुद्ध गेल अखेरच्या षटकात धावबाद झाल्यानंतर निकोलस पूरनने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजयी केले. यानंतर गेलला विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्याने हटके उत्तरे देत मनोरंजन केले. गेलला प्रश्न करण्यात आला होता की, ‘इतक्या सामन्यांतनंतर पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे फलंदाजी करताना तू नर्व्हस होतास का?’ यावर गेलने आपल्या अंदाजात उत्तर दिले की, ‘मी नर्व्हस अजिबात नव्हतो. कम ऑन... यूनिव्हर्स बॉस फलंदाजी करत होता. मी नर्व्हस कसा काय होऊ शकेल? खेळपट्टी खूपच संथ होती, पण तरीही यावर दुसºया डावात फलंदाजी करणे चांगले होते’नेहमी सलामीला खेळणाºया गेलला या सामन्यात तिसºया स्थानी खेळावे लागले. यावर गेलने सांगितले की, ‘संघाने मला तिसºया स्थानी फलंदाजी करण्यास सांगितले. माझ्यासाठी हा काही मुद्दा नाही. आमचे सलामीवीर सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यामुळेच या जोडीसोबत कोणतीही छेडछाड करण्याचा आमचा विचार नव्हता. मला जे काम देण्यात आले होते, ते मी केले.’