Indian Premier League ( IPL 2020) मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) १३ धावांनी राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) हार मानण्यास भाग पाडले. DCच्या ७ बाद १६१ धावांचा पाठलाग करताना RRला ८ बाद १४८ धावा करता आल्या. या विजयासह दिल्लीनं १२ गुणांसह Point Tableमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. मुंबई इंडियन्स १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीनं गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले असते तरी त्यांचा 'टॉप'चा फलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे. अमित मिश्रा, रिषभ पंत, इशांत शर्मा यांच्यानंतर आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानं दिल्लीची चिंता वाढली आहे. मिश्रा व शर्मा यांनी IPL 2020मधूनच माघार घेतली आहे.
प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन ( ५७) आणि श्रेयस अय्यर ( ५३) यांनी अर्धशतकी खेळी करून दिल्लीला ७ बाद १६१ धावांपर्यंत मजल मारून दिली. राजस्थान रॉयल्सनं कमबॅक करताना दिल्लीच्या धावगतीला वेसण घातले. जोफ्रा आर्चरनं १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर जयदेव उनाडकट ( २/३२) आणि कार्तिक त्यागी व श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी एक विकेट घेत योगदान दिले. बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी ज्या प्रकारे सुरुवात केली, ते पाहून राजस्थान सहज बाजी मारेल असेच वाटत होते.
अॅनरीच नॉर्ट्झेनं सामना फिरवला. त्यानं बटलर ( २२) व रॉबिन उथप्पाला ( ३२) माघारी पाठवले. आर. अश्विन, अक्षर पटेल यांनीही महत्त्वाचे फलंदाज बाद केले. पदार्पणवीर तुषार देशपांडेनं RRचा हुकमी खेळाडू बेन स्टोक्स ( ४१) याची विकेट घेत सामन्याला कलाटणी दिली. उथप्पाच्या चुकीच्या कॉलनं रिया पराग बाद झाला. कागिसो रबाडा, नॉर्ट्झे व देशपांडे यांनी अखेरच्या षटकांत टिच्चून मारा करताना दिल्लीचा विजय पक्का केला. पण, या विजयानंतरही त्यांना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर यानं खांद्याच्या दुखापतीमुळे मैदान सोडले. त्याच्या दुखातपीबाबत शिखऱ धवन म्हणाला,''त्याला वेदना होत आहेत. त्याच्या दुखापतीबाबत गुरुवारी काय ते समजेल. त्याला खांदा हलवता येत आहे. प्रार्थना करतो की, त्याची दुखापत गंभीर नसावी.''