जून 2019नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) Indian Premier League 2020मधून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहे. जवळपास वर्षभरानंतर धोनी अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. कोरोना व्हायरसमुळे MS Dhoni रांची येथील आपल्या फार्म हाऊसवर कुटुंबीयांसोबत होता. त्याची पत्नी साक्षीनं सोशल मीडियावरून धोनीचे लॉकडाऊन काळातील अनेक व्हिडीओ अन् फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पण, आता धोनी आयपीएलसाठी UAEत दाखल झाला आणि तेथे त्यानं सरावात तुफान फटकेबाजीही केली. मुंबई इंडियन्सचे खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसोबत UAEत दाखल झाले आहेत, परंतु अन्य कोणत्याही फ्रँचायझीनं खेळाडूंच्या कुटुंबियांना नेलेलं नाही. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबियांची आणि कुटुंबियांना त्यांची आठवण येणं साहजिक आहे.
धोनीची पत्नी साक्षी धोनी ( Sakshi Dhoni) हिलाही माहीची आठवण येत आहे. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी ती आतुर झाली आहे. रविवारी CSKच्या खेळाडूंनी सराव केला. त्यांचे सराव सत्र इंस्टाग्रामवर लाईव्ह दाखवण्यात आलं आणि त्यावेळी साक्षीनं तिच्या भावना व्यक्त केल्या. मला माहीला पाहायचे आहे, अशी कमेंट साक्षीनं केली. CSK मीडिया मॅनेजर रसेल राधाकृष्ण यानं साक्षीची ही मागणी पूर्ण केली आणि त्यानं कॅमेरा लगेच धोनीकडे फिरवला. त्यानंतर साक्षीनं त्याचे आभार मानले व संघाला IPL 2020साठी शुभेच्छा दिल्या. साक्षी आणि महेंद्रसिंग धोनी यांनी 2010मध्ये लग्न केलं आणि 2015मध्ये दोघं आई-बाबा बनले.
पाहा व्हिडीओ...
चेन्नई सुपर किंग्स Chennai Super Kings Players List (CSK) - महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, मुरली विजय, रुतुराज गायकवाड, इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन
संपूर्ण वेळापत्रक ( Chennai Super Kings TimeTable 2020) 19 सप्टेंबर - शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी22 सप्टेंबर, मंगळवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह25 सप्टेंबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई2 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई4 ऑक्टोबर, रविवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई7 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी10 ऑक्टोबर, शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई13 ऑक्टोबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई17 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह19 ऑक्टोबर, सोमवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी23 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह25 ऑक्टोबर, रविवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई29 ऑक्टोबर, गुरुवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई1 नोव्हेंबर, रविवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी
अन्य महत्त्वाच्या बातम्या
अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात? Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली IPL 2020त खेळणार?
IPL 2020: महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, हार्दिक, शिखर खेळले 'गल्ली' क्रिकेट; पाहा Video
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकणार; रोहित शर्माची झोप उडणार!