Join us  

IPL 2020 : पंजाब-राजस्थान संघांदरम्यान ‌करा अथवा मरा लढत

IPL 2020: ​​​​​​​स्पर्धेच्या सुरुवातीला सलग पराभव स्वीकारणाऱ्या केएल राहुलच्या संघात एकदम चमत्कारिक बदल झाला आहे. त्यांनी सलग चार विजय मिळवत अव्वल चारमध्ये स्थान पटकावले आहे. सध्या हा संघ १२ सामन्यात १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे तर रॉयल्स १२ सामन्यात १० गुणांसह सातव्या स्थानी आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 4:01 AM

Open in App

अबूधाबी : सलग विजयामुळे आत्मविश्वास  उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबला आयपीएल स्पर्धेत शुक्रवारी राजस्थान रॉयल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उभय संघांसाठी ही  लढत करा अथवा मरा अशा धर्तीची आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला सलग पराभव स्वीकारणाऱ्या केएल राहुलच्या संघात एकदम चमत्कारिक बदल झाला आहे. त्यांनी सलग चार विजय मिळवत अव्वल चारमध्ये स्थान पटकावले आहे. सध्या हा संघ १२ सामन्यात १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे तर रॉयल्स १२ सामन्यात १० गुणांसह सातव्या स्थानी आहे.  प्ले-ऑफची शर्यत सध्या जर-तरवर अवलंबून आहे. मुंबई इंडियन्सचा अपवाद वगळता  अन्य सहा संघांना प्ले-ऑफची समान संधी आहे तर चेन्नई सुपरकिंग्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. रॉयल्सला जर शुक्रवारी पराभव स्वीकारावा लागला तर त्यांचेही आव्हान संपुष्टात येईल, पण पराभवामुळे पंजाबचा मार्गही खडतर होईल. पंजाब संघाला स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या राहुलकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. ख्रिस गेलच्या समावेशामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे दोन सामने बाहेर राहिलेला मयंक अग्रवाल संघात परततो किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे. मजबूत बाजूपंजाब। सलामीची जोडी शानदार फॉर्मात. गेलही लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी. मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय.राजस्थान। स्टोक्स, सॅमसन, स्टीव्हन स्मिथ , राहून तेवतिया शानदार फॉर्मात. बटलरकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा. कमजोर बाजू पंजाब। ग्लेन मॅक्सवेल आऊट ऑफ फॉर्म. मयांक अग्रवाल दुखापतग्रस्त.राजस्थान।  मधल्या फळीचे अपयश संघासाठी चिंतेचा         विषय. जयदेव उनाडकटला गोलंदाजीमध्ये लौकिकाला     साजेशी कामगिरी करता         आलेली नाही.

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाबराजस्थान रॉयल्स