Indian Premier League ( IPL 2020) च्या १३ व्या पर्वाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी प्रत्येकी १० गुणांसह प्ले ऑफच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली आहे. पण, उरलेल्या एका जागेसाठी पाच संघांमध्ये चुरस रंगणार आहे. चेन्नईची शक्यता ना च्या बरोबर आहे. त्यांना ७पैकी ६ सामने जिंकावे लागतील. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मैदानावर उतरण्यापूर्वी CSKनं त्यांच्या ट्विटर हँडलवर रजनीकांतचा फोटो पोस्ट करून एक आशा व्यक्त केली आहे.
CSK चा संघ यंदा प्ले ऑफपर्यंत मजल मारेल का? यावर सट्टा लावला जात आहे आणि बरीच जण 'नाही' याच पक्षातील आहेत. डॅडी आर्मी असलेल्या चेन्नईनं यंदाच्या लीगमध्ये सपशेल निराश केले. सुरेश रैना व हरभजन सिंग यांच्या माघारीनंतर बसलेल्या धक्क्यातून संघ डोकं वरच काढताना दिसत नाही. त्यात प्रत्येक सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) प्रयोग सुरू आहेत, फलंदाज अपयशी ठरत आहेत, हेच सांगतोय. ७ पैकी २ विजय मिळवून ४ गुणांसह सातव्या स्थानावर असलेला हा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवेल, याची शक्यता अंधुक आहे. पण, २०१०मध्ये अशाच परिस्थितीतून चेन्नईनं थेट अंतिम फेरीत प्रवेश करून जेतेपद पटकावले होते. पण, तेव्हाचा संघ अन् आताच्या वाढलेल्या वयाचे खेळाडू यात फरक आहे.
- वेदर रिपोर्ट । ३७ डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता. ह्युमिडिटी २९ टक्के तर हवेचा वेग २६ किमी. प्रति तास राहण्याची शक्यता.
- पीच रिपोर्ट । प्रथम फलंदाजी करणाºया संघाला लाभ मिळतो, पण गेल्या सामन्यात राजस्थानने लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळविला.
- चेन्नई । शेन वॉटसन व फाफ ड्यूप्लेसिस यांनी चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजीमध्ये दीपक चाहर व जडेजा प्रभावी ठरले.
- हैदराबाद। बेयरस्टो, वॉनर, मनीष पांडे, केन विलियम्सन सातत्याने चांगल्या धावा करीत आहेत.
कमजोर बाजू
- चेन्नई। लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी. मधली फळी आऊट ऑफ फॉर्म.
- हैदराबाद। पराभवामुळे मनोधैर्यावर परिणाम झाला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध चुरशीच्या लढतीत गोलंदाजी कमकुवत. संदीप शर्मा, खलील अहमद व युवा अभिषेक शर्मा गोलंदाजीमध्ये अपयशी.
''IPLचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे आणि आशा करतो की सर्वकाही CSKच्या बाजूनं घडेल.'' दरम्यान आजच्या सामन्यात चेन्नई फिरकीपटू इम्रान ताहीरला संधी देऊ शकतो.