आयपीएल २०२० चे सत्र चेन्नई सुपर किंग्जसाठी फारसे चांगले राहिलेले नाही. या सत्रात संघाला पराभवाचा सामना जास्त वेळा करावा लागला आहे. यंदा गेल्यावेळचा पर्पल कॅप विनर इम्रान ताहीर याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. यंदा इम्रान फक्त बेंचवर बसुन आहे. आणि तो मैदानात खेळाडूंना ड्रिंक्स नेऊन देण्याचे काम करत आहे.
याआधी इम्रानने हे माझे कामच असल्याचे म्हटले होते. मात्र आता संघाच्या पराभवासोबतच त्याचे दु:ख बाहेर येऊ लागले आहे. त्याने म्हटले की गेल्या वर्षी फाफ डु प्लेसीला इतर खेळाडूंसाठी ड्रिंक्स उचलताना पाहत होतो. तेव्हा खुप दु:ख वाटत होते. त्याची टी २०तील कामगिरी चांगली असून देखील तो गेल्या वेळी बेंचवर होता. आता माझी पाळी आहे.’
आर. अश्विनच्या यु ट्युब चॅनेलवर गप्पा मारताना त्याने हे वक्तव्य केले आहे. चेन्नईच्या संघाने तीने फिरकीपटूंंना अंतिम ११ मध्ये स्थान दिले होते.त्यात रविंद्र जाडेजा, पियुष चावला आणि कर्ण शर्मा यांचा समावेश असला तरी दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर ताहीरला अद्याप संधी मिळालेली नाही.
२०१९ च्या सत्रात ताहीर याने १७ सामन्यात २६ बळी घेतले होते. दक्षिण आफ्रिकन खेळाडू असलेल्या ताहीर याची टी २० तील कामगिरीही सरस राहिली आहे.