मुंबई : आज Indian Premier League (IPL 2020) मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mubai Indians) या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणाºया सामन्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमींची उत्सुकता ताणली गेली आहे. या दोन संघांतील सामन्याद्वारेच यंदाच्या आयपीएलला सुरुवात झाली होती. त्यावेळी चेन्नईने शानदार विजय मिळवताना विजयी सुरुवात केली होती. या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच आता मुंबईकरांनी कंबर कसली असून प्रत्येक खेळाडू नेट्समध्ये घाम गाळतोय. मुंबईचा स्टार यष्टिरक्षक क्विंटन डीकॉकही (Quinton De kock) नेट्समध्ये खूप मेहनत घेत आहे. मात्र एक गोलंदाज त्याला नेट्सध्ये जखडवून ठेवत. स्वत: डीकॉकने याची माहिती दिली आहे.
डीकॉक स्टम्पच्या पाठीमागे तो जितकी चपळ कामगिरी करत आहे, तितकीच आक्रमक कामगिरी तो स्टम्पच्या पुढेही करत आहे. डीकॉकने सर्वच गोलंदाजांची बेदम पिटाई केली असली, तरी नेट्समध्ये एक गोलंदाज त्याची चांगलीच परीक्षा घेत आहे. हा गोलंदाज आहे जसप्रीत बुमराह.
मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेल्या ट्वीटरवरील व्हिडिओमध्ये डीकॉकला काही प्रश्न विचारण्यात आले होते आणि प्रत्येक प्रश्नाला दोन पर्याय देण्यात आले होते. यात एक प्रश्न होता की, नेट्समध्ये कोणत्या गोलंदाजाचा सामना करणे सर्वात कठीण जाते? यावर डीकॉकला बुमराहसोबत न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट असा पर्याय देण्यात आला होता.
यावर डीकॉकने नेट्समध्ये बुमराहचा सामना करणे सर्वात कठीण जात असल्याचे म्हटले. यंदाच्या सत्रात मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी आपला दबदबा राखला आहे. विशेष करुन बुमराह आणि बोल्ट यांनी. बुमराहने आतापर्यंत ९ सामने खेळले असून त्याने १५ बळी घेतले आहेत. दुसरीकडे, बोल्टनेही ९ सामन्यांतून १२ बळी घेतले आहेत. त्याचप्रमाणे, विकेट कीपिंग करताना युवा लेगस्पिनर राहुल चहरविरुद्ध मोठा कस लागतो, असेही डीकॉकने यावेळी म्हटले.
Web Title: IPL 2020: Jasprit Bumrah is the hardest to deal with; Says South Africa's star batsman
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.