राजस्थान रॉयल्सचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरने या सत्रात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे. सर्वात वेगवान २० चेंडूपैकी १६ चेंडूत जोफ्रा आर्चरने टाकले आहेत. आर्चरने सर्वात वेगवान चेंडू १५२.३ प्रति किमी तास या वेगाने टाकला आहे. त्या खालोखाल त्यानेच १५०.८२ आणि १५०.७५ या वेगाने चेंडू टाकले आहे. त्याशिवाय एन्रिच नॉर्टत्जे, जोश हेझलवुड आणि नवदीप सैनी यांनी सर्वात वेगवान चेंडू टाकले आहेत.
नवदीप सैनी याने १४७.९२ किमी प्रति तास या वेगाने चेंडू टाकले आहेत. या यादीत फक्त सैनी हा एकटाच भारतीय गोलंदाज आहे. त्या व्यतिरिक्त एकाही गोलंदाजाला या वेगाने चेंडू टाकता येणार आहे. आयपीएल २०१९मध्ये कागिसो रबाडा (दिल्ली कॅपिटल्स) याने १५४.२३ किमी प्रति तास या वेगाने चेंडू टाकला होता. त्यासोबतच त्यानेच सर्वात वेगवान चार चेंडू टाकले होते. या सोबतच चेन्नई सुपर किंग्ज च्या जोश हेझलवुडने या यादीत स्थान मिळवले आहे. त्यानेही १४७.३२ च्या गतीने चेंडू टाकला आहे.