Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात गुरुवारी किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) ख्रिस गेल ( Chris Gayle) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) यांच्या अर्धशतकाच्या आणि मयांक अग्रवालच्या ४५ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. KXIPचा ८ सामन्यांतील हा दुसराच विजय आहे आणि त्यांना Play Off च्या शर्यतीत कायम राहण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील. ख्रिस गेलचा IPL 2020 मधील पहिलाच सामना होता आणि त्यानं आपल्या फटकेबाजीनं सर्वांचे लक्ष वेधले.
या सामन्याआधी RCBचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या डान्सनं सर्वांचे लक्ष वेधले. इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यालाही कोहलीच्या डान्सवर कमेंट देण्यापासून स्वतःला रोखता आले नाही. त्याची ही कमेंट आता तुफान व्हायरल झाली आहे.
नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण संथ होत असलेल्या खेळपट्टीवर बंगळुरूला निर्धारीत २० षटकांत १७१ धावा करता आल्या. बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४८ के्ल्या. बंगळुरूने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी जोरदार सुरुवात करून दिली. दोघांनीही बंगळुरूच्या गोलंदाजांना झोडपून काढले. मयांक आणि राहुलने पॉवर प्लेच्या पहिल्या ६ षटकांत ५६ धावा फटकावल्या. युझवेंद्र चहलने मयांक अग्रवालला बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. मयांकने २५ चेंडून ४५ धावा फटकावल्या.
मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतर लोकेश राहुल आणि ख्रिस गेलने आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली. गेल (५३) आणि राहुलने (६१) आपापली अर्धशतके पूर्ण करत पंजाबला विजयासमिप नेले. पंजाबला विजयासाठी एक धाव हवी असताना गेल धावचीत झाला. मात्र तोपर्यंत पंजाबचा विजय निश्चित झाला होता. शेवटी सामन्यातील शेवटच्या चेंडूवर निकोलस पूरनने खणखणीत षटकार ठोकत पंजाबला विजय मिळवून दिला.
सामन्यापूर्वी विराट कोहली मैदानावर बेधुंद डान्स करताना दिसला.