इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात १४ गुणांसह अव्वल स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) सोमवारी रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले. मागील दोन सामने मैदानाबाहेर बसलेल्या कर्णधार रोहित ( Rohit Sharma) चा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर असून तो आयपीएलमधूनही माघार घेईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या चर्चा सुरू असताना MI नं त्याच्या दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले.
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यानंतर त्यानं चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेतली होती. त्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही तो खेळला नाही. त्यात आज तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. निवड समिती प्रमुख सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टीम इंडियाची निवड केली. नवदीप सैनीला तीनही संघात स्थान देण्यात आले असून दुखापतग्रस्त रोहित शर्माचे नाव निवड केलेल्या एकाही संघात नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. वरुण चक्रवर्थीला ट्वेंटी-२० संघात स्थान मिळाले आहे.
पण, रोहित दुखापतीतून सावरला असून त्यानं सोमवारी नेट्समध्ये कसून सरावही केला. मुंबई इंडियन्सनं सराव करतानाचे त्याचे फोटो पोस्ट केले.
Web Title: IPL 2020: Just what we love to see! Hitman Rohit Sharma in action at today’s training
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.