इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमाला तीन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात २९ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सलामीचा सामना होणार आहे. पण, Corona Virus मुंबई या स्पर्धेवर रद्द करण्याचे सावट आले आहे. त्यात मंगळवारी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाचे नेतृत्व कोहलीकडे आहे आणि कर्नाटक सरकारने आयपीएलचे सामन्यांचे आयोजन करण्यास नकार दिला आहे.
कर्नाटकमध्येकोरोना व्हायरसने बाधित झालेला एक रुग्ण आढळल्याची माहिती कर्नाटक वैद्यकीय शिक्षक मंत्री के सुधाकर यांनी दिली. अमेरीकेहून परतलेली ही व्यक्ती जवळपास २६६६ व्यक्तिंच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याला बंगळुरु येथील Rajiv Gandhi Institute of Chest Diseases (RGICD) येथे ठेवण्यात आले आहे. बंगळुरू येथील आयटी कंपनीनजीक असलेल्या सर्व प्राथमिक शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यात आयपीएल स्पर्धेदरम्यात कोरोना व्हायरस अजून पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण, तरीही आयपीएल ही नियोजित वेळापत्रकानुसार होईल असा विश्वास बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं घेतला आहे.
पण, कर्नाटक राज्य सरकारनं आयपीएल स्पर्धा पुढे ढकलावी किंवा रद्दच करावी अशी विनंती करणारे पत्र केंद्र सरकारला पाठवल्याचे वृत्त स्थानिक न्यूज चॅनेल Digvijay 24/7 यांनी दिले. त्यात त्यांनी असा दावा केला आहे की, कर्नाटक राज्य सरकराने आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन करण्यास नकार दिला आहे. बंगळुरू हे विराट कोहलीच्या RCB संघाचे घरचे मैदान आहे. येथील चिन्नास्वामी स्टेडिमयवर RCBचे सामने होतात. त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारनं खरंच असा काही निर्णय घेतला असल्यास तो कोहलीसाठी मोठा धक्काच असेल.
दरम्यान, आयपीएल पुढे ढकलायची की नाही याबाबत महाराष्ट्र सरकार विचार करत असल्याची माहिती, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे म्हणाले,''मोठ्या संख्येनं लोकं जिथे जमतात तेथे कोरोना व्हायरससारख्या संक्रामक रोगचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. अशा स्पर्धा नंतरही आयोजित केल्या जाऊ शकतात. त्यामुळे आयपीएल पुढे ढकलावी की नाही, यावर चर्चा सुरू आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...रंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग, हार्दिक-नताशा रंगले प्रेमाच्या रंगात!
Corona Virus मुळे Asia XI vs World XI सामने रद्द? बीसीसीआयचे संकेत
Mumbai Indiansच्या अष्टपैलू खेळाडूला दुखापत, ट्वेंटी-२० लीगमधून माघार
WADAला धक्का; आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला द्यावी लागली साडेतीन कोटींची भरपाई
Web Title: IPL 2020 : Karnataka Government writes a letter to central government; not ready to host matches in Bengaluru svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.