Indian Premier League (IPL) 2020 च्या १३व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाचे आव्हान एलिमिनेटरमध्ये संपुष्टात आले. सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं विराट कोहलीच्या RCBवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. IPL च्या १३ पर्वात एकही जेतेपद न पटाकवाणारा RCB हा किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) नंतर दुसरा संघ ठरला. महत्वाच्या सामन्यात RCBला ७ बाद १३१ धावाच करता आल्या आणि SRHनं हे लक्ष्य केन विलियम्सनच्या अर्धशतकाच्या जोरावर पार केलं. केन व जेसन होल्डर यांनी पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली.
प्रथम फलंदाजीला आलेल्या RCBला जेसन होल्डरनं धक्के दिले. होल्डरनं २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. एबी डिव्हिलियर्सला दुसऱ्या बाजूनं योग्य साथ न मिळाल्यानं RCBला २० षटकांत ७ बाद १३१ धावाच करता आल्या. एबीनं ४३ चेंडूंत ५६ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केननं ४४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह नाबाद ५०, तर होल्डरनं ३ चौकारांच्या मदतीनं नाबाद २४ धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
RCBच्या अपयशानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू केट क्रॉस हीनं RCBला ट्रोल केलं. संघसहकारी अॅलेक्झांड्रा हार्टली हिच्या ट्विटवर रिप्लाय देताना क्रॉसनं MS Dhoniचं ‘definitely not’ या वाक्याची मदत घेतली. चेन्नई सुपर किंग्सच्या अखेरच्या साखळी सामन्यात नाणेफेक करताना धोनीला विचारले गेले होते की, पिवळ्या जर्सीतील हा तुझा अखेरचा सामना का? त्यावर धोनीनं ‘definitely not’ असे उत्तर दिले.
Web Title: IPL 2020: Kate Cross uses MS Dhoni’s viral quote to troll RCB and her England teammate Alexandra Hartley
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.