अबूधाबी : गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जात आहे, मुंबई इंडियन्स आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल करण्याची शक्यता नाही. केकेआर संघात जर सुनील नारायण खेळला नाही तर त्याचा मुंबई इंडियन्स संघाला लाभ होईल.
फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखण्यात आलेले अपयश केकेआरसाठी महत्त्वाची अडचण ठरली आहे. तिसऱ्या वेगवान गोलंदाजाऐेवजी केकेआर संघ फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देण्याची शक्यता आहे. युवा शुभमान गिल, इयोन मॉर्गन, नितीश राणा आक्रमक फलंदाजी करण्यास सक्षम आहेत. मुख्य फिरकीपटू सुनील नारायणच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. आंद्रे रसेलचा खराब फॉर्म हा चिंतेचा विषय ठरतो.
Web Title: IPL 2020, KKR vs MI Match: Mumbai's parde heavy against KKR; Doubts about Sunil Narayan's play
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.