अबूधाबी :कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाला सूर गवसला असून बुधवारी येथे खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या लढतीत स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध (आरसीबी) पहिल्या टप्प्यात झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यास उत्सुक असेल.
फर्ग्युसनने केकेआर संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजवाली होती. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली केकेआर संघ १० गुणांसह चौथ्या स्थानी आहे. संघाच्या अद्याप पाच लढती शिल्लक आहेत. दुसºया बाजूचा विचार करता आरसीबी संघ केकेआरच्या तुलनेत दोन गुणांनी आघाडीवर आहे. राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव केल्यानंतर हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.
मजबूत बाजू -
केकेआर - वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनची उपस्थिती. फिरकी गोलंदाजीमध्ये सुनील नारायणला गोलंदाजीची संधी. लेग स्पिनर कुलदीप यादवने गेल्या लढतीत चांगला मारा केला होता.
आरसीबी - डिव्हिलियर्स, कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्मात. फिरकीपटू युजवेंद्र चहलचीही दमदार कामगिरी.
कमजोर बाजू -
केकेआर - पॅट कमिन्सला (९ सामन्यांत ३ बळी) लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश. स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल ‘आऊट ऑफ फॉर्म.
आरसीबी - सलामीवीर देवदत्त पडिक्कल चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयशी. अॅरोन फिंचला सूर गवसलेला नाही. कमकुवत गोलंदाजी.
आमने-सामने -
सामने - २५
विजय - आरसीबी - ११, केकेआर - १४, अनिर्णित : 0
Web Title: IPL 2020 KKR vs RCB Preview : KKR Eager to retaliation the defeat against RCB
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.