Indian Premier League ( IPL 2020) च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या Mumbai Indians (MI) संघाला पराभव पत्करावा लागला. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) गतविजेत्यांना पराभूत केले. आता त्यांचा पुढील सामना बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) विरुद्ध होणार आहे. KKRचा हा या मोसमातील पहिलाच सामना आहे आणि त्यात विजयी सलामीसाठी ते संपूर्ण ताकदीनं तयार आहेत. KKRनं त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला, त्यात त्यांचा स्फोटक फलंदाज तुफान फटकेबाजी करताना दिसत आहे. त्यानं या फटकेबाजीत कॅमेराची काचच फोडली आणि त्या व्हिडीओनं मुंबई इंडियन्सला धोक्याचा इशारा दिला आहे. ( RCB vs SRH Live Score & Updates )
IPL 2020 : मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सामन्यानं केला Record Break; जय शाह यांची घोषणा
IPLमध्ये ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, आंद्रे रसेल, निकोलस पूरन, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, इत्यादी स्फोटक फलंदाजांची नेहमीच चर्चा रंगते. यंदा ही स्पर्धा UAEत होत आहे. येथील वातावरणाशी जुळवून घेऊन मैदानावर चौकार-षटकाराची आतषबाजी करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. त्यासाठी प्रत्येकानं नेटमध्ये कसून सराव केला आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली KKRचा संघ बुधवारपासून IPL 2020च्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. MIविरुद्धच्या सामन्यापूर्वी KKRनं आंद्रे रसेलच्या फटकेबाजीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 32 वर्षीय अष्टपैलू खेळाडूनं कॅमेराची काच फोडली. दोन वेळच्या विजेत्या KKRना व्हिडीओ पोस्ट करून त्यावर "Oh gosh! That’s SMASHED - wait for the last shot.. #MuscleRussell warming up to his devastating best! @Russell12A #KKRHaiTaiyaar #Dream11IPL''असे लिहिले.
Munde baaro **** , लोकेश राहुलने वापरले अपशब्द; सोशल मीडियावर Video Viral
पाहा व्हिडीओ...
IPL 2019मध्ये रसेलनं 56.66च्या सरासरीनं आणि 204.81च्या स्ट्राइक रेटनं 504 धावा चोपल्या आणि त्यात 4 अर्धशतकांचा समावेश होता. शिवाय त्यानं संघाकडून सर्वाधिक 11 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला. रसेलनं Caribbean Premier League (CPL) 2020मध्येही तुफान फटकेबाजी केली. त्यानं जमैका थलाव्हास संघाचे प्रतिनिधित्व करताना 9 सामन्यांत 141.40 च्या स्ट्राइक रेटनं 222 धावा केल्या. त्यात ती अर्धशतकांचा समावेश आहे. यात त्यानं 16 षटकार खेचले, शिवाय तीन विकेट्सही घेतल्या.
कोलकाता नाइट रायडर्स Kolkata Knight Riders Players List (KKR) -
नेश कार्तिक, टॉम बँटन, शुबमन गिल, आंद्रें रसेल, हॅरी गर्नी, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, ल्युकी फर्गुसन, नितीश राणा, प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, एस वॉरियर, शिवम मावी, सिद्देश लाड, सुनील नरीन, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्थी, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, सिद्धार्थ, प्रविण तांबे, निखिल नाईक
कोलकाता नाइट रायडर्सचे वेळापत्रक ( KKR Time Table IPL 2020)
23 सप्टेंबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
26 सप्टेंबर, शनिवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
30 सप्टेंबर, बुधवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
3 ऑक्टोबर, शनिवार, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
7 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
10 ऑक्टोबर, शनिवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी
12 ऑक्टोबर, सोमवार - ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
16 ऑक्टोबर, शुक्रवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
18 ऑक्टोबर, रविवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी
21 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
24 ऑक्टोबर, शनिवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी
26 ऑक्टोबर, सोमवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
29 ऑक्टोबर, गुरुवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 नोव्हेंबर, रविवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
Web Title: IPL 2020: KKR’s Andre Russell sounds warning alarm ahead of Mumbai Indians clash, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.